दिल्लीत होणाऱ्या लवकुश रामलीलामधून पूनम पांडेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
रामलीलामध्ये पूनम पांडे रावणाच्या पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार होती.
रामलीलामधील अभिनेत्रीच्या सहभागामुळे समाजाच्या विविध घटकांकडून विरोध दर्शवण्यात आला.
दरवर्षी नवरात्री उत्सवात दिल्लीत लवकुश रामलीला आयोजित केली जाते. यंदा या 'रामलीला'मध्ये अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) रावणाच्या पत्नीची म्हणजेच मदोदरीची भूमिका साकारणार होती. मात्र अभिनेत्रीच्या 'रामलीला'मधील प्रवेशामुळे हिंदू संघटनेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे समितीकडून झालेल्या निर्णयामुळे पूनम पांडेची लवकुश रामलीलामधून एक्झिट झाली आहे. सोशल मीडियावर पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिला 'रामलीला'मध्ये सहभाग घेण्याची संधी दिल्यामुळे ती खुश असल्याचे सांगत होती. मात्र आता पूनम पांडे 'रामलीला'ला भाग नाही.
पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती रामलीलामध्ये काम कारायला मिळाल्यामुळे धन्यवाद मानताना दिसत आहे. ती म्हणाली की, "दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जगात प्रसिद्ध असलेला लव कुश रामलीलाचा प्ले सादर होतो. त्या मला रावणाची पत्नी मंदोदरी हे महत्वाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. मी खूप खुश आहे. त्यामुळे मी ठरवले आहे की, मी पूर्ण नवरात्रीत उपवास ठेवेन. म्हणजे मनापासून हे पात्र साकरण्यास मला मदत होईल. जय श्री राम!"
23 सप्टेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामलीला समितीने पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार नसल्याचे जाहीर केले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण शंकर कपूर म्हणाले की, अभिनेत्री पूनम पांडे अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. त्यांना कास्ट केल्यानंतर अनेक वाद झाले. त्यामुळे समितीने पूनम पांडेऐवजी दुसरी अभिनेत्री हे पात्र साकारेल असा निर्णय घेतला.
समितीने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, "लव कुश रामलीला समितीच्या वतीने पूनम पांडेने दोदरीची भूमिका साकारण्यास समती दिली. त्यांच्या उत्साहाचा आणि सहकार्याचा आम्ही आदर करतो. मात्र तुमच्या निवडीनंतर आम्हाला समाजाच्या विविध घटकांकडून वेगवेगळे प्रतिसाद मिळाले.
आमच्या समितीचे उद्दिष्ट भगवान श्री रामांचे आदर्श आणि संदेश समाजापर्यंत योग्य आणि आदरपूर्वक पोहोचवणे आहे. जर कोणत्याही परिस्थितीमुळे या उद्दिष्टावर परिणाम होत असेल तर त्यांना संबोधित करणे हे आमचे कर्तव्य आहे. विचारविनिमयानंतर समितीने निर्णय घेतला आहे की, यावर्षी मंदोदरीची भूमिका दुसऱ्या कलाकार साकारेल. हा निर्णय केवळ सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. समितीचा तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम तोच आहे आणि तो कमी झालेला नाही.तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील यशासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.