Ekta Kapoor News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि टेलिव्हिजन क्विन अशी ओळख असलेल्या एकता कपूरला (Ekta Kapoor) सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. एकताला 'ट्रिपल एक्स' या सीरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावले आहेत. 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने एकता कपूरची कानउघडणी केली. एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरीज प्रदर्शित करण्यात आली होती. (Bollywood) (Bollywood Actress)
एकता कपूरची 'ट्रिपल एक्स' ही वेबसीरीज अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली होती. सध्या या वेबसीरीजची सर्वच स्तरांत चांगलीच चर्चा रंगत आहे. या वेबसीरीजमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल सीन असून, त्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत, एकता कपूरविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एकता कपूरविरोधात वॉरंट जारी करण्यात आला. सैनिकांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्याही भावना दुखावल्याबद्दल एकता कपूरविरोधात वॉरंट जारी केला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी एकता कपूरला सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.
सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवी यांच्या खंडपीठाने एकता कपूर यांना खडेबोल सुनावले. निश्चितरित्या काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आपण या देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणांची माथी कलुषित करत आहात. ओटीटी हा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध असतो. तसेच ही वेबसीरीज पाहण्यासाठी सर्वांनाच पर्याय आहे. या माध्यमातून सर्वांचीच मने तुम्ही प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांना कशा प्रकारचे पर्याय देत आहेत?, असे खंडपीठाने नमूद केले.
एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही बाजू मांडली. पाटणा उच्च न्यायालयात संबंधित याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या प्रकरणी तिथे लवकर सुनावणी होईल की नाही याबद्दल शंका आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकता कपूर यांना संरक्षण दिले होते. ही वेबसीरीज एका ठराविक विषयावर आधारित आहे आणि या देशात कोणाला काहीही आवडण्याचे स्वातंत्र्य आहे.
तसेच एकता कपूर प्रकरणावर कोर्टानेही आपले मत मांडले आहे, कोर्ट म्हणाले, की 'तुम्ही प्रत्येक वेळी कोर्टात येता, याचे आम्हाला कौतुक नाही. या अशा याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु. रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता. हे न्यायालय प्रभाव असलेल्या लोकांसाठी नाही, तर आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा, सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असेही यावेळी कोर्टाने खडेबोल सुनावले.
माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरुन बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने एकता कपूर विरोधात अटक वॉरंट जारी केली होती. तक्रारदारांनी २०२० मध्ये याबद्दल आपली तक्रार दाखल केली होती. या वेबसीरीजच्या दुसऱ्या पर्वात सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेल्या अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याचा आरोप होता.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.