Sapna Choudhary
Sapna Choudhary Instagram @itssapnachoudhary
मनोरंजन बातम्या

Sapna Choudhary : सपना चौधरी विरोधात तक्रार दाखल, भावाच्या बायकोचा केला कारसाठी छळ

Pooja Dange

FIR File Against Dancer Sapna Choudhary: सपना चौधरी आणि तिच्या कुटुंबीयांवर तिची वाहिनीने छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हरियाणवी डान्सर आणि बिग बॉसची माजी स्पर्धका सपना चौधरी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पलवल पोलिसांनी तक्रार करून घेतली आहे.

हरियाणा पोलिसांनी सपना चौधरी, तिचा भाऊ करण चौधरी आणि तिच्या आईवर हुंड्यासाठी तिच्या वाहिनीचा छळ आणि मारहाण केल्याच्या तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून या सर्वांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सपनाच्या वाहिनीने आरोप केला आहे की, सासरच्यांनी केलेल्या मागणीवरून तिचे कुटुंबीय तिला क्रेटा कार देऊ शकले नाहीत. त्यामुळे तिचा छळ करण्यात आला. सपनाच्या वाहिनीने आरोप केला आहे की, तिच्यावरही मारहाण, छळ आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पलवल येथील रहिवासी सपना चौधरीच्या वाहिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, तिचे लग्न दिल्लीतील नजफगढ येथील रहिवासी करण याच्याशी २०१८ साली झाले होते, लग्नाच्या वेळी तिच्या घरच्यांनी भरपूर सोने दिले, तसेच दिल्लीत एका मोठ्या हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडला होते, ज्यासाठी त्यावेळी सुमारे 42 लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

हुंड्यासाठी अनेकदा तिचा छळ झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यासाठी तिला मारहाणही करण्यात आली आहे. सपनाच्या वाहिनीने सांगितले की, जेव्हा तिने मुलीला जन्म दिला तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी (माहेरच्या लोकांनी) 3 लाख रुपये, दागिने आणि नवीन कपडे कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू दिले होते, परंतु सपनाचे कुटुंब त्यांच्याकडे कारची मागणी करत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी तिचा छळ सुरू केला आणि गेल्या वर्षी मे महिन्यात मद्यधुंद अवस्थेत तिच्या पतीने तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडितेचा पती, तिची नणंद सपना चौधरी आणि सासू नीलम यांच्याविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2022) गायक आणि डान्सरवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता, सपना चौधरीवर 2018 मध्ये एका कार्यक्रमात अॅडव्हान्स घेऊनही तिचा परफॉर्मन्स न केल्याचा आरोप होता. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटही काढण्यात आले होते.

फसवणूक केल्या प्रकरणी सपना चौधरी आणि अन्य चार आरोपींवरही न्यायालयाने आरोप केले आहेत. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपना विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. लखनौ येथील स्मृती उपवन येथील नृत्य कार्यक्रमात तिने आयोजकांकडून आगाऊ पैसे घेतले असतानाही ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

SCROLL FOR NEXT