Pathaan 10th Day : 'पठान' काय थकत नाय.. दहाव्या दिवशीही विक्रमी कमाई

२५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'पठान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत.
Pathaan 10th day collection
Pathaan 10th day collectionSaam Tv
Published On

Pathan Box Office Collection Day 10: २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'पठान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सनी चित्रपटगृहांमध्ये एकाच गर्दी केली होती.

४ वर्षानंतर प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या या चित्रपटाने देशातच नाही तर परदेशात देखील धुडगूस घातला आहे. चला तर पाहूया 'पठान' चित्रपटाचे १० व्या दिवसाचे कलेक्शन किती आहे ते.

Pathaan 10th day collection
Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराचा लग्न मंडप सजला! शाहरुखचा बॉडीगार्ड घेतोय सोहळ्याच्या सुरक्षिततेची विशेष काळजी

अर्ली ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार 'पठान' चित्रपटाने दहाव्या दिवशी १५ करोडची कमाई केली आहे. 'पठान' चित्रपटाने दहाव्या दिवशी चांगली कमाई केली आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. काल शुक्रवार असल्याने सर्वांचे लक्ष वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो याकडे आहे.

पहिल्या दिवशी - 57 करोड, दुसऱ्या दिवशी - 70.5 करोड, तिसऱ्या दिवशी - 39.5 करोड, चौथ्या दिवशी - 53.25 करोड, 5व्या दिवशी - 60.75 करोड, 6व्या दिवशी - 26.5 करोड, 7व्या दिवशी - 23 करोड, 8वा दिवस - 18.25 करोड, 9व्या दिवशी - 15.65 करोडचा व्यवसाय करण्यात चित्रपटाला यश मिळाले आहे.

'पठान' चित्रपटाने भारतातच 379.18 करोडची कामे केली आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत तसेच नवीन रेकॉर्ड बनविले आहेत. परदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. लवकरच 'पठान' चित्रपट १००० करोड कामवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट होईल.

शाहरुख खानचे फॅन्स 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी अनेक उद्योग करत आहेत. चित्रपटातील अॅक्शन सीन्ससह प्रेक्षकांना शाहरुख दीपिकाची केमिस्ट्री देखील आवडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com