Prajakta Mali  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळी 'नवोदित कवयित्री' म्हणून सन्मानित; भावुक पोस्ट करत म्हणाली, अभिनेत्री असताना...

Prajakta Mali Poetess Award : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला 'नवोदित कवयित्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'फुलवंती'खूप गाजत आहे. प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्रीसोबत चांगली कवयित्री, नृत्यांगना आणि व्यावसायिका देखील आहे. तसेच 'फुलवंती' या चित्रपटामुळे तिने निर्माती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. नुकताच अशा हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) नवोदित कवयित्री म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

प्राजक्ता माळीला 'महाराष्ट्र साहित्य परिषद' चा 'सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार' मिळाला आहे. या मोठ्या पुरस्काराने प्राजक्ताला गौरविण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला तिने भावुक कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताला हा सन्मान मिळाल्यामुळे चाहते खूप खुश पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळी भावुक पोस्ट

"पुरस्कार अनेक मिळतात पण साहित्य क्षेत्रातील संस्थांची मातृसंस्था असलेल्या "महाराष्ट्र साहित्य परिषदेचा" पुरस्कार मिळणं हे माझं अहोभाग्य...महाराष्ट्र साहित्य परिषद...सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार...नवोदित कवयित्री....स्थळ -माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे..."

"याच ठिकाणी प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं अशा ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला. योगायोग... अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून सन्मान मिळणं हे दुर्मिळ...पाठीवर शाबासकीची थाप, पुढील लेखनासाठी प्रोत्साहन...मसाप चे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे विशेष आभार..."

आपल्या मनातील भावना मांडणारे कॅप्शन प्राजक्ता माळीने पोस्टला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर सध्या चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या सौंदर्याने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट अजूनही गाजत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडेने केले आहे. 'फुलवंती'चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहे. प्राजक्ताने आजवर अनेक हिट चित्रपट, नाटक आणि मालिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

Saiyaara worldwide collection : 'सैयारा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींपार

Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

SCROLL FOR NEXT