Phule Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Phule Box Office Collection : 'फुले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले?

Phule Box Office Collection Day 1 : प्रतीक गांधीच्या 'फुले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'फुले' (Phule ) चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या भूमिकेत प्रतीक गांधी (Pratik Gandhi ) आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पत्रलेखा (Patralekha ) आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर अनेक आक्षेप चित्रपटावर घेण्यात आले. ज्यामुळे चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली. मात्र आता अखेर फुले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

'फुले' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'फुले' हा बहुचर्चित चित्रपट काल (25 एप्रिल) ला रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मीडिया रिपोर्टनुसार, 'फुले' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 24 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात 21 लाख रुपये कमावले आहे. 'फुले' चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर चित्रपटांचे कलेक्शन

सध्या बॉक्स ऑफिसवर 'फुले' चित्रपटासोबतच 'ग्राउंड झिरो', 'जाट'आणि 'केसरी 2' हे चित्रपट देखील पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'ग्राउंड झिरो'चित्रपटाने 'फुले' चित्रपटाला मागे टाकले आहे. सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने जगभरात 107 कोटी तर भारतात 93.8 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे अक्षय कुमारच्या 'केसरी 2' ने जगभरात 70.7 कोटी आणि 50.7 कोटींचा व्यवसाय केला आहे.

बॉक्स ऑफिसवर 'फुले' आणि 'ग्राउंड झिरो' चित्रपटाची टक्कर पाहायला मिळत आहे. 'फुले' चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आहे. 'फुले' आणि 'ग्राउंड झिरो' चित्रपट काल (25 एप्रिल) एकाच दिवशी रिलीज झाला आहे. भविष्यात 'फुले' की 'ग्राउंड झिरो' कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

यंदाच्या विकेंडला कोणता मुव्ही पाहाल? १२-१८ जानेवारीमध्ये ओटीटीवर काय होणार रिलीज पाहा

Nashik : मतदानाआधी शिंदेंच्या उमेदवारवर गुन्हा दाखल, अपहरण करतानाचा CCTV व्हायरल

Hot Yoga: झटक्यात वजन कमी करण्यासाठी करा हॉट योगा, एका आठवड्यात वितळेल शरीराची चरबी

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा, या महिलांना ₹१५०० मिळालेच नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT