Kesari 2 Box Office Collection: अक्षय कुमारच्या 'केसरी 2' चा रंग उडाला; चौथ्या दिवशी कमाईत झाली मोठी घट

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 4: अक्षय कुमार आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिकांतील 'केसरी 2' चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.
Kesari 2 Box Office Collection Day 2
Kesari 2 Box Office CollectionSAAM TV
Published On

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 4: अक्षय कुमार आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिकांतील 'केसरी 2' चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. मात्र, चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या कमाईत काहीशी घट झाली आहे. तरीही, या चित्रपटाची एकूण कमाई समाधानकारक आहे.

१८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चार दिवसांत चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.८४ कोटी, दुसऱ्या दिवशी १०.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११.७० कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ४.५० कोटी अशी कमाई केली आहे, ज्यामुळे आतापर्यंत एकूण ३४.१३ कोटींची कमाई झाली आहे.

Kesari 2 Box Office Collection Day 2
Tiger Shroff Death Threat: जीवे मारण्याची धमकी की पोलिसांची दिशाभूल; अभिनेता टायगर श्रॉफ धमकी प्रकरणात आला नवा ट्विस्ट

अक्षयच्या चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईनुसार, केसरी चॅप्टर २ या चित्रपटाने आतापर्यंत कमी कमाई केली आहे. पण अभिनेत्याच्या चित्रपटाला आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल अशी अपेक्षा आहे.

Kesari 2 Box Office Collection Day 2
Paithani Saree Look: पैठणी साडीमध्ये रॉयल लूक हवाय, मग असे ब्लाऊज डिझाइन नक्की ट्राय करा

चित्रपटाची कथा आणि कलाकारांचे अभिनय कौशल्य प्रेक्षकांना आवडले आहेत. विशेषतः अक्षय कुमार आणि आर. माधवन यांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. चित्रपटातील संगीत आणि छायाचित्रणही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. 'केसरी 2' हा चित्रपट 'केसरी'चा सिक्वेल असून, जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत चांगली कमाई केली असून, पुढील दिवसांतही त्याची कामगिरी कशी राहते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com