ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पारंपरिक पैठणी साडीसोबत जरीच्या किनाऱ्याने सजलेला मोर डिझाईन असलेला ब्लाउज शोभून दिसतो.
हलकी नक्षी आणि डोरींसह सजलेला डीप बॅक कट ब्लाउज ट्रेंडमध्ये आहे, जो मॉडर्न टच देतो.
हाई नेक कॉलर ब्लाउज तुम्हाला शाही लुक देणारा हा डिझाईन खास समारंभासाठी उत्तम पर्याय ठरतो.
हे ब्लाउज समोरून क्रॉस ओव्हर कटमध्ये असतात आणि राजेशाही लुक तयार करतात.
नव्या पिढीतील मुलींसाठी स्लीव्हलेस किंवा जाळीदार स्लीव्हचा ट्रेंडी पर्याय आहे
कटवर्क किंवा बुट्ट्यांनी सजवलेला ब्लाउज पारंपरिक साडीत उठाव आणतो.
थोड्या झगमगाटासाठी आरशांची नक्षी किंवा काथीचे भरतकाम असलेले ब्लाउज निवडा.