Samruddhi Kelkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Samruddhi Kelkar : हातावर मेहंदी अन् हिरवा चुडा...! समृद्धी केळकर लवकरच अडकणार लग्नबंधनात? फोटोने वेधलं लक्ष

Samruddhi Kelkar Post : 'फुलाला सुगंध मातीचा' फेम मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. तिच्या एका खास पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

सध्या मनोरंजन विश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. एकीकडे तुमचे आवडते कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर काहींनी आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. दुसरीकडे कलाकार नवीन घर आणि गाड्या विकत घेत आहे. एकंदर मनोरंजन सृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणात एका अभिनेत्रीच्या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' फेम मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. या मालिकेने समृद्धीला खूप लोकप्रियता मिळवून दिली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या कामाविषयी, आपले वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले. नुकतीच तिने एक खास पोस्ट केली आहे.

अभिनेत्री समृद्धी केळकरने इन्स्टाग्राम एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये समृद्धीने एक फोटो शेअर करून मस्त कॅप्शन दिलं आहे. जे पाहून तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. समृद्धीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा हात पाहायला मिळत आहे. हातामध्ये तिने हिरवा चुडा घातला आहे. तसेच सुरेख मेंहदी काढली आहे. हा फोटो खूपच सुंदर दिसत आहे.

फोटोला दिलेल्या हटके कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कळवते लवकरच..." तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये देखील समृद्धीच्या लग्नाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. कलाकार हार्टचे इमोजींचा कमेंटमध्ये पाऊस पाडत आहे. तर अक्षय केळकरने "अखेर...वाट पाहतोय..." अशी कमेंट केली आहे. या पोस्टमागे नेमकं कारण काय, जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT