Dhanshri Shintre
लग्नात हिरवा चुडा का भरला जातो? तुम्हाला माहितीय का यामागाचं शास्त्रीय कारण काय आहे.
वधूबरोबरच इतर स्त्रियाही हा हिरवा चुडा हातात घालतात. लग्नाच्या संदर्भात हिरव्या रंगाला व बांगड्यांना खूप महत्त्व असतं.
महाराष्ट्रात हिंदू लग्नात हिरवा चुडा घालण्याची पद्धत आहे.
हिरवा रंग हे ताजेपणा, टवटवीतपणा, निसर्ग, सकारात्मकता यांचं प्रतीक आहे.
हीच प्रसन्नता लग्नसंस्कारात अनुभवता यावी, स्त्रियांच्या आयुष्यात व पर्यायानं त्यांच्या संसारात रुजावी अशा उद्देशानं लग्नात हिरवा चुडा घातला जातो.
स्त्रियांनी बांगड्या घालणं हे शुभ समजलं जातं. हिंदू धर्मानुसार बांगड्या नवरीचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात.
हिरवा रंग संपन्नता दर्शवतो. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे वधूचा संसार प्रेम, सुख आणि समृद्धीनं भरलेला राहील असा त्यामागचा उद्देश असतो.
वधूला तिच्या पुढच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये असा त्यामागचा अर्थ असतो.
NEXT: लग्न झालेल्या महिला पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या कारण...