Falguni Pathak  Instagram/ @falgunipathak12
मनोरंजन बातम्या

Falguni Pathak: नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल

गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.

सुरज सावंत

मुंबई - गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक मुंबईत (Mumbai) गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी बोरिवलीत फाल्गुनी पाठकतर्फे (Falguni Patahk) नवरात्रोत्सवानिमित्त स्व.प्रमोद महाजन क्रीडा संकुल बोरिवली (Borivali) येथे १३ एकर जागेवर २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिथे लोकांकडून 800 ते 4200 पर्यंत प्रवेश फी घेतली जाईल. मात्र, उत्सवापूर्वीच हा कार्यक्रम अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. (Petition filed against Falguni Patahk)

फाल्गुनी पाठकने आयोजित केलेल्या नवरात्रीच्या या कार्यक्रमाविरोधात वकील मयूर फरिया आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी याचिका दाखल केली आहे. ग्लिट्ज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट या शोच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

वकील मयूर फारिया सांगतात की, जेव्हा आयोजक मैदान बुक करतात तेव्हा कमी शुल्कात मैदान बुक केले जाते, मात्र कार्यक्रमादरम्यान खाद्यपदार्थांचे स्टॉल, पार्किंग आणि तिकिटे विकून करोडो रुपये कमावले जातात. फाल्गुनी पाठक यांना दांडिया क्वीन म्हटले जाते. फाल्गुनी गेली 32 वर्षे सातत्याने प्रत्येक नवरात्रीच्या मंचावर सादरीकरण करत आहे.

मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सोशल ग्राउंडचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही, असे वकील मयूर फारिया यांचे म्हणणे आहे. कार्यक्रमाचे आयोजन केले तर ते मोफत करावे आणि पार्किंग, फूड स्टॉल अशा अन्य मार्गाने पैसे कमवू नयेत, अशी मागणी मयूर फारिया यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT