Maharashtra Politics : मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा प्लॅन; ठाकरेंना धक्का?

भाजप आणि शिंदे गट नवनवीन रणनिती आखत आहेत.
Eknath shinde and Devendra Fadnavis
Eknath shinde and Devendra Fadnavis saam tv
Published On

Maharashtra Political News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने (Maharashtra Politics) तिहेरी रणनिती आखली आहे. मुंबईतल्या मराठी आणि प्रामुख्याने अमराठी मतांवर भाजपकडून (BJP) लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. तर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट भक्कमपणे कायदेशीर बाजू मांडणार असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde News Today)

Eknath shinde and Devendra Fadnavis
Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. सुरूवातील आमदार त्यानंतर खासदार आणि नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली.

दरम्यान, मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजप (Devendra Fadnavis) आणि शिंदे गट नवनवीन रणनिती आखत आहेत. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार सज्ज झालं आहे. मुंबईतील मराठी आणि अमराठी मतांवर भाजप लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics News Today)

Eknath shinde and Devendra Fadnavis
Raj Thackeray : जय महाराष्ट्र! राज ठाकरेंची विदर्भ दौऱ्यातून फेसबुक पोस्ट

दुसरीकडे, एकनाथ शिंदे गट सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आपली बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याकडेच असावं असा शिंदे गटाचा प्लॅन आहे.

भाजप-मनसे युती नाहीच!

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी भाजप राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, भाजपने तुर्तास मनसेसोबत युती करण्याचं टाळलं असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा समाचार घेण्यासाठी मनसेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com