Payal Malik Armaan Malik Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Payal Malik Armaan Malik Divorce : अरमान मलिकचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट होणार का? पायल मलिकने व्हिडिओ शेअर करत केले स्पष्ट

Payal malik vlog : बिग बॉस' हा शो नेहमी चर्चेत असतो. 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. मात्र या सीनझनमधील अरमान मलिक हा स्पर्धेक प्रचंड चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस हा शो कायमच प्रचंड चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस ओटीटीचं तिसर पर्व सुरु झालं आहे. या सीझनमध्ये आपल्याला विविध क्षेत्रातील स्पर्धेक पाहायला मिळत आहेत. शो सुरु होताच स्पर्धेकामध्ये आपल्याला कडाक्याचे वाद पाहायला मिळालेत. परंतू बिग बॉस ओटीटी ३चे पर्व गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिकमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

अरमान मलिक हा एक प्रसिद्ध युट्यूबर(YouTuber) आहे. शिवाय तो त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईमुळे चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी ३ या पर्वात तो त्याच्या दोन्ही पत्नीसह सहभागी झाला आहे . मात्र बिग बॉस ओटीटी ३ च्या पर्वाततून अरमान यांची पहिली पत्नी पायल हिला कमी ओटच्या अभावामुळे बाहेर जावे लागले होते.

ज्या वेळेस आरमान मलिक(Malik) दोन्ही पत्नीसह बिग बॉसच्या घरात आला तेव्हा त्याची संपूर्ण जीवनाचा प्रवास जगासमोर आला.तेव्हापासून अरमानवर अनेक आरोप होत आहेत. शिवाय अरमान मलिक त्याच्या असलेल्या दोन बायकांमुळे प्रचंड ट्रोल होत आहे. अरमानच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रेक्षकांची सहानुभूती होती मात्र जेव्हा तिने बिग बॉसमध्ये असलेला एक स्पर्धक म्हणजेच विशाल पांडेबद्दल एक वक्तव्य केले, त्या दिवसापासून पायल मलिक लोकांच्या निशाण्यावर आली. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

पायल आणि अरमानमध्ये घटस्फोट?

पायल मलिकला प्रेक्षकांनी ट्रोल केल्यानंतर पायलने सध्या असा निर्णय घेतला आहे,जो ऐकल्यानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण होऊन जाईल. सध्या प्रत्येक नेटकरी वर्गाच्या कानावर पायल आणि अरमानच्या घटस्फोट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कारण पायलने सध्या एक व्हिडिओ(Video) व्हायरल केला होता ज्यात ती असं काही म्हणाली आहे की त्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. पायलने कायम अनेक व्लॉग करत असते मात्र तिने परत एक व्लॉग केला आहे त्यामध्ये तिने अरमानपासून घटस्फोट घेण्याचे सांगितले आहे. जेव्हा पायलने व्लॉग पब्लिश केला तेव्हा त्या व्लॉगचे शीर्षकच 'पायल अरमानला घटस्फोट देत आहे' असे होते. ज्या व्लॉगमध्ये पायल बोलत आहे की,' घडलेल्या सर्व गोष्टींची परिणाम हळू हळू आमच्या मुलांवर होतोय आणि अनेक लोकांना वाटत आहे की आम्ही तिंघ वेगळे व्हावे' यानंतर पायल म्हणते की,'दररोजच्या गोष्टींना सहन करण्यापेक्षा मी गोलू आणि अरमान आल्यांतर मुलांसोबत वेगळे होणे चांगले ठरेल'.

टोकाचा निर्णय का घेतला?

पायलने म्हणते की, मला कोणत्याच गोष्टी आता सहन होत नाहीत. ते दोघेही आता बिग बॉसच्या घरात आहेत,त्यांना त्यामुळे काही कळू शकत नाही काय चालले आहे ?ते बिग बॉसच्या घरात आहेत ते त्यांच्या खेळ (Game)खेळत आहेत. परंतू मला सर्व तणाव जाणवत आहे.मी अनेक गोष्टींचा विचार केला तसेच आमच्या मुलांचीही विचार केला? त्यानंतर ती म्हणाली माझ्यासोबत जे घडलं ते तिच्या मुलांसोबत नको घडायला. त्यामुळे पायल तिच्या चारही मुलांबाबत निर्णय घेणार आहे.पंरतू यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय ती एकटी घेऊ शकत नाही. मात्र दोघ बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर आम्ही चर्चा करु आणि निर्णय घेऊ. शेवटी आम्ही काय निर्णय घेतोय तो सर्व ताहच्या वर्गाला सांगण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT