Pathaan 7th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan 7th Day Box Office Collection: इथं तिथं देखु जहा हाय 'पठान'चीच हवा, आणखी एक रेकॉर्ड मोडत शिरपेचात रोवला मानाचा तुरा...

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहे.

Chetan Bodke

Pathan Box Office Collection: सातव्या दिवशीही शाहरुख खानच्या पठानची बॉक्स ऑफिसवर जादू जोमात सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने दमदार कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने ७ दिवसात सर्वाधिक कमाई करणारा ९वा आणि बॉलिवूडमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये कमाई करणारा हा चित्रपट ७वा ठरला आहे. चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 20 ते 22 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यापैकी भारतातील चित्रपटाचे कलेक्शन 19.28 इतके आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाने आगाऊ बुकिंगपासून सातव्या दिवसापर्यंत केलेली कमाई आश्चर्यकारक आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग 50 कोटींहून अधिक होती. 'पठान'ने पहिल्याच दिवशी 57 कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाने पाच दिवसांत ५४२ कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी भारतात 300 कोटींचा आकडा पार केला होता. तर आता या चित्रपटाने एका आठवड्यात जगभरात 600 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

'पठान' चित्रपट प्रदर्शित होताना देशभरात अनेक निदर्शने करण्यात आले होते. तरीही हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटातील शाहरुख खानची ॲक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शाहरुख खानच्या ३२ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच तो फुल ऑन ॲक्शनमध्ये दिसत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने या चित्रपटातून दमदार पुन:रागमन केले आहे.

या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणाही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना आपल्या खास अभिनयाची झलक दाखवण्यासाठी सलमान खान १० मिनिटांसाठी पाहुणा कलाकार म्हणुन आला आहे, त्याची ही झलक सर्वांच्याच पसंदीस उतरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

SCROLL FOR NEXT