Pathaan: कमाईच्या बाबतीत अजूनही 'पठान' बराच मागे, जगभरात आजही ‘या’ भारतीय चित्रपटाचा वाजतोय डंका...

आता पर्यंत संपूर्ण जगभरात चित्रपटाने तब्बल ५५० कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पठान’च्या पुढे अनेक भारतीय चित्रपट आहेत.
Shah Rukh Khan's Pathan Film
Shah Rukh Khan's Pathan Film SAAM TV

Pathaan: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे. तब्बल एका आठवड्यातच ५०० कोटींचा पल्ला या चित्रपटाने सहज पार केला. चित्रपटाची प्री- बुकिंग देखील मोठे आकडे आपल्याला दाखवत होते. आता पर्यंत संपूर्ण जगभरात चित्रपटाने तब्बल ५५० कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. लवकरच 'पठान' चित्रपट १००० कोटींचा ही सहज पल्ला गाठू शकतो. परंतू इतके असले तरी, जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पठान’च्या पुढे अनेक भारतीय चित्रपट आहेत.

Shah Rukh Khan's Pathan Film
Dasara Teaser: 'पुष्पा' ची हवा कमी होणार? 'दसरा'च्या दमदार टीझरमुळे उत्सुकता शिगेला...

या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३३५ कोटींचा पल्ला गाठला आहे. चित्रपटाला बऱ्याच प्रमाणात मिळालेल्या नकारानंतर चित्रपटाने बरीच चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात एकूण ५५० कोटींच्या आसपास एकूण कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाने 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडीत काढला होता. आता लवकरच ‘बाहुबली १’ ला मागे टाकणार असून ‘बाहुबली १’ने जगभरातून ५९९.७२ कोटींची कमाई केली होती.

Shah Rukh Khan's Pathan Film
Aarya 3 Teaser: डोळ्यावर गॉगल, हातात सिगार, सुश्मिताचा 'आर्या ३'मधील डॅशिंग लूक

‘पठान’ची जरी सध्या सर्वत्र चर्चा होत असली तरी जगभरातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी चित्रपटाला अजून भरपूर कमाई करावी लागणार आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरातून २०२३.८१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर त्या खालोखाल ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ या चित्रपटांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आता ‘पठान’ या चित्रपटांना मागे टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Shah Rukh Khan's Pathan Film
Lalita Shivaji Babar Teaser Out: प्रसिद्ध धावपटुचे आयुष्य रुपेरी पडद्यावर झळकणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटाचे टीझर प्रदर्शित...

शाहरुख तब्बल चार वर्षानंतर 'पठान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ५० कोटींची तर जगभरात १०० कोटींची कमाई करत ओपनिंग केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com