Dasara Teaser: २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना धूळ चारत दक्षिणात्य चित्रपट पहिल्या क्रमांकावर आले. दमदार कथानक आणि चित्रपटातील तगडी स्टारकास्टची फळी पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंदी दर्शवली. RRR, पुष्पा आणि कांतारा या दाक्षिणात्य चित्रपटांनी २०२२ हे वर्ष गाजवलं. त्यातही पुष्पाच्या डायलॉगची भुरळ प्रेक्षकांवर आजही कायम आहे. पण आता पुष्पाला टक्कर देण्यासाठी नवा सिनेमा येऊ घातलाय. 'दसरा' या नव्या साऊथ सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला हा टीझर पाहून प्रेक्षकांना नक्कीच पुष्पा चित्रपटाचा विसर पडणार अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे. हा चित्रपट मुळ तेलुगू भाषेत असून हिंदीसह तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कौतुक आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केले आहे. साऊथ अभिनेता नानी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. टीझरमध्ये धमाकेदार अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार असून टीझर पुष्पा सिनेमासारखाच दिसत असला तरी सिनेमाची कथा फारच वेगळी आहे.
नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरमध्ये पुष्पा चित्रपटासारखीच झलक दिसते. म्युझिक देखील पुष्पा चित्रपटासारखीच असल्याचे दिसते. एका छोट्या गावातील मुलगा आपल्या गावकऱ्यांच्या सर्वांच्या मदतीला धावुन येत असतो. चित्रपटाचा जॉनर कसा असणार अद्याप याची माहिती नसून सिनेमा जबरदस्त अँक्शन सीन्सनं भरलेला आहे हे मात्र नक्की. कोळशाच्या खाणीच्या मधोमध वसलेलं एक गाव आहे ज्यात कोण राम आणि कोण रावण हे कोणालाच माहिती नाही. हातात विळा घेऊन सगळेच एकमेकांचं रक्त पिण्यासाठी तहानलेले आहेत.
आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी चित्रपटाचा टीझर पाहून त्याला पसंदी दर्शवली आहे. चित्रपटाचा टीझर आवडल्याने त्यांनी टीझरही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे अभिनेता धनुष, शाहिद कपूर, दलकीर सलमान, रक्षित शेट्टी यांनीही सिनेमाचा टीझर शेअर करत पसंती दर्शवली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांता ओडेला यांनी केले असून मुख्य भूमिकेत कीर्ती सुरेश, साई कुमार आणि शआइन टॉम चाको दिसणार आहे. चित्रपट 30 मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.