Ranveer Singh and Deepika Padukone Ranveer Singh | Instagram@ranveersingh Deepika Padukone | Instagram@deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका- रणवीरचे हॉलिडे सेलिब्रेशन, व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही सुट्टीचा आनंद लुटत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये दीपिकाचा लूक चाहत्यांना फार आवडला. टीझरमध्ये दीपिका अॅक्शनमध्ये दिसत असून तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

दीपिका बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दीपिका आणि रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बॉलिवूडची ही सुंदर जोडी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

रणवीर सिंगने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात रणवीर सिंग करताना दिसत आहे . व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, दीपिका पदुकोण तिच्या पतीबरोबर सुआनंद लुटताना दिसत असून अभिनेता आपल्या प्रेमळ पत्नीला थोडा त्रास देताना दिसत आहे. यादरम्यान दोघेही बोटीत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रणवीरने दीपिकासाठी 'क्यूटी' असे लिहिले आहे.

लुकबद्दल बोलायचे तर, दीपिकाने पांढरा टी-शर्ट आणि ब्लॅक शॉट कॅरी केला आहे, ज्यामध्ये तिने पांढरे शूज आणि काळ्या घातला आहे. तसेच, रणवीर पांढरा टी-शर्ट, काळ्या ट्रॅक पॅन्टमध्ये दिसत आहे. दोघेही या बोटीत रम्य वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

दीपिका आणि रणबीर 2018 साली लग्नाच्या बंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात मतभेद सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, हे चुकीचे असल्याचे दिसत आहे.

रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग लवकरच 'रॉकी और रानी की लव्ह स्टोरी' आणि 'सर्कस'मध्ये दिसणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पुढील वर्षी 10 फेब्रुवारीला 2023 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर दीपिका 'पठाण', 'जवान', 'फायटर'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT