VFX In Pathan Teaser: बॉलिवूडचा बादशाह मानल्या जाणाऱ्या शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला आपला 57 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी त्याने चाहत्यांना भेटवस्तूच्या माध्यमातून त्याचा आगामी 'पठाण' चित्रपटाचा या टीझरही प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, बऱ्याच जणांना हा टीझर आवडलेला नाही.
व्हीएफएक्ससह अनेक गोष्टींसाठी ट्रोलर्स चित्रपटाला ट्रोल करत आहेत. ट्रोल करणाऱ्यांनी सोशल मीडियावर 'बॉयकॉट पठाण'ची मोहीम सुरू केली आहे. शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अनेक दिवसाच्या ब्रेकनंतर दिसणार आहे. 2023 मध्ये त्याचा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. यामुळेच लोक त्याच्या चित्रपटाच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.शाहरुख खानचे अनेक चित्रपट आहेत ज्यात VFX वर विशेष काम केले आहे. 'पठाण' चित्रपटात व्हीएफएक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे, पण ट्रोलर्सना ही बाब समजत नाही.
चित्रपटाच्या टीझरमध्ये ट्रोलर्स शाहरुखला VFX साठी ट्रोल करत आहे. काही लोक म्हणतात की जेव्हा 2 मिनिटांच्या टीझरमध्ये VFX बरोबर नसेल तर 2 तासांच्या चित्रपटात काय होईल? चित्रपटाच्या टीझरमधील VFX बऱ्याच जणांना पटलेले नाही. पण हा चित्रपट बॉयकॉट व्हावा यासाठी भरपूर चर्चा होत आहे.
एका दृश्यात, शाहरुख फॅन्सी जेटपॅकच्या मदतीने उडताना दिसत आहे. दृश्याचा फोकस अजूनही जमिनीवर आहे आणि शाहरुख खान खूपच अस्पष्ट दिसत आहे, ज्यामुळे दृश्याला एक विचित्र, अपूर्ण देखावा मिळतो. अनेकांनी त्याची तुलना 2018 मधील प्रभासच्या 'साहो'मधील तत्सम दृश्याशी केली, जी यापेक्षा थोडी चांगली दिसत होती.
बुधवारी 15 हजार पेक्षा जास्त ट्वीट्ससह साहो देखील ट्विटरवर ट्रेंड होत होता. "हा #PathaanTeaser पाहिल्यानंतर #saho बद्दलचा माझा आदर हजारो पटीने वाढला," असे ट्विट आहेत. सध्या VFXवरुन चित्रपट बराच ट्रोल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.