Parineeti Chopra And Raghav Chaddha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra's Reaction: ‘सिर्फ स्माईल ही काफी है...’ राघव चड्डाविषयी विचारल्यावर परिणीतीची गोड...

Parineeti Chopra's Reaction On Raghav Chaddha: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगत आहे. अशातच परिनीतीच्या लग्नाच्या चर्चा होत असताना ती मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आली आहे.

Chetan Bodke

Parineeti Chopra And Raghav Chaddha: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगत आहे. दोघेही मुंबईत सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेट करताना स्पॉट झाले होते. त्यानंतर परिणीती- राघव लग्न करणार असल्याच्या सगळीकडे बोलले जात होते. अशातच परिनीतीच्या लग्नाच्या चर्चा होत असताना ती मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आली आहे. यावेळी चर्चांवर मौन धरत एक स्मित हास्य देऊन पुढे गेली.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि आप नेते राघव चढ्ढा यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी माध्यमांनी परिणीतीला लग्नाबद्दल विचारले असता, ती थोडी लाजून चुर झाली. परीला विमानतळावर माध्यमकर्मींनी तिला पाहताच लग्नाच्या बातम्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे प्रश्न ऐकून चर्चांवर मौन धरत एक स्मित हास्य देऊन पुढे गेली.

सध्या परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा सूट घातला असून त्याचसोबत व्हाईट हायनेक टॉप घातला आहे. विमानतळावरून कारकडे जात असताना पापाराझींनी परिणीतीला घेरले आणि तिच्या एंगेजमेंटच्या बातम्यांबाबत विचारपूस सुरू केली. हा प्रश्न ऐकून परिणीतीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देत पुढे निघून गेली. काहीच न बोलता परिणीती लाजत कारमध्ये बसली.

या व्हिडिओमध्ये परीची प्रतिक्रिया पाहून पापाराझीही 'आम्हाला उत्तर मिळाले आहे' असे म्हणत होते. या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्स पाहता, अनेकांचे म्हणणे आहे की, परिणीतीची स्माईल एंगेजमेंटच्या बातमीला पुष्टी देत ​​आहे. परीचे नाव आप नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, आतापर्यंत दोघांनी डेटिंग किंवा एंगेजमेंटच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अभिनेत्री लवकरच तिच्या लग्नाची घोषणा करेल अशी आशा परिणीतीच्या चाहत्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT