Parineeti Raghav Net Worth And Education Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra - Raghav Chadha: शिक्षण, संपत्तीमध्ये परिणीती चोप्रा राघव चड्ढापेक्षा सरस

Parineeti - Raghav Net Worth: राघवपेक्षा परिणीती खूप श्रीमंत आहे.

Pooja Dange

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Celebration:

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नविधींना कालपासून सुरुवात झाली आहे. लग्नविधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

उदयपूर येथील 'द लीला पॅलेस' येथे राघव-परिणीती यांच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूड सेलेब्रिटींसह राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत. 'राघनीती' यांच्याविषयी जाणून घेण्यास फॅन्स खूप उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊया या दोघांविषयी.

लव्हस्टोरी

राघव आणि परिणीती कॉलेजपासूनच एकमेकांना ओळखतात. परंतु त्यांच्या प्रेमाची सुरुवात २०२२ साली झाली. परिणीती पंजाबमध्ये तिच्या 'चमकीली या चित्रपटाहे शूटिंग करत होती तेव्हा राघवशी तिची भेट झाली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. जेव्हा दोघांना मुंबईत स्पॉट करण्यात आले तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चां होऊ लागल्या.

परिणीती-राघव यांचे शिक्षण

परिणीती आणि राघव दोघेही उच्च शिक्षित आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याआधी परिणीतीने फायनान्समध्ये पदवी घेतेली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार परिणीतीने मँचेस्टर बिजनेस स्कुलमधून बिजनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्स मिळवला आहे. तर राघवने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. या दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. जेव्हा त्यांना लंडनमध्ये भारत युके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स या पुरस्कारने गौरविण्यात आले. (Celebrity)

परिणीती - राघव नेटवर्थ

परिणीती आणि राघव यांच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर राघवपेक्षा परिणीती खूप श्रीमंत आहे. caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ६० करोड रुपये आहे. तर राघव चड्ढाच्या निवडणुक एफिडेव्हिटमध्ये त्याची एकूण संपत्ती ५० लाख असल्याचे दाखविण्यात आले आहे.

परिणीतीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये ऑडी ए-६, ऑडी क्यू ५, Jaguar XJL या गाड्या आहेत. तर राघव चड्ढाकडे मारुती स्विफ्ट डिझायर ही गाडी आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT