Tharala Tar Mag Serial: मेकअपची कमाल की खरीखुरी घटना; शिल्पा नवलकरचा व्हिडीओ पाहून प्रेक्षक बुचकळ्यात

Shilpa Navalkar Post: अभिनेत्री शिल्पा नवलकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
 Shilpa Navalkar In Tharal Tar Mag Serial
Shilpa Navalkar In Tharal Tar Mag SerialSaam TV

Shilpa Navalkar Entry In Tharal Tar Mag:

जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाहावरील मालिका टीआरपीमध्ये टॉपला आहे. या मालिकेत आता 'बाईपण भारी देवा' फेमी अभिनेत्री शिल्पा नवलकरची एन्ट्री होणार आहे. या भागात शिल्पाचा लूक बदलण्यात आला आहे.

अभिनेत्री शिल्पा नवलकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जुई गडकरी देखील दिसत आहे. अभिनेत्री काही मिनिटांच्या सीनसाठी किती मेहनत करावी लागते हे शेअर केले आहे.

 Shilpa Navalkar In Tharal Tar Mag Serial
The Vaccine War Trailer: भारतातील कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'The Vaccine War'चा ट्रेलर प्रदर्शित

शिल्पा नवलकर यांच्या व्हिडीओमध्ये त्या मेकअप रूममध्ये दिवसत आहेत. त्यांच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागाला प्लास्टर लावले आहे. त्याचा वापर करून मास्क तयार करण्यात आला आहे. तर त्यानंतर शिल्पा यांच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत. (Latest Entertainment News)

शिल्पा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले आहे, 'काही क्षणांसाठी दिसणाऱ्या भाजल्याच्या खुणा दाखवण्यास मागे असणारी मेहनत!! ठरलं तर मग, स्टार प्रवाहवर...' शिल्पा यांचा चेहरा खूप विद्रुप दिसत आहे. मेकअप आर्टिस्टने त्याच्या चेहऱ्यावरील मेकअप खराखुरा दिसण्यासाठी खूप मेहनत केली आहे.

शिल्पा नवलकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी शिल्पा यांचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी या व्हिडीओवर कमेंट करत शिल्पा आणि मेकअप आर्टिस्ट येणाचे कौतुक केले आहे.

'ठरलं तर मग'मध्ये काय सुरू आहे

ठरलं तर मग या मालिकेत सध्या दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. सायलीने (Jai Gadkari) थरावर पटपट सरसर चढून दहीहंडी फोडली. सायलीचे हे रूप पाहून अर्जुन खूप इम्प्रेस झाला आहे. अर्जुनला सायली आवडायला लागली आहे. तर दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता सायलीला तर देत आहेत. तिच्या साड्यांना त्यांनी तेल लावून ठेवले आहे. तर सायली देखील त्यांचा डाव त्यांच्यावर उलटणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com