Parineeti Chopra -Raghav Chadha SAAM TV
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra : परिणीती चोप्राकडे गुडन्यूज? राघव चड्ढा यांनी स्वतः दिली हिंट

Is Parineeti Chopra Pregnant? : लोकप्रिय कपल परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आई-बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर राघव चड्ढा यांनी मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

लोकप्रिय कपल परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा कायम चर्चेत असतात.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा पाहायला मिळत आहे.

राघव चड्ढा यांनी गुडन्यूज बद्दल स्वतः हिंट दिली आहे.

Parineeti Chopra- Raghav Chadha Pregnancy News : बॉलिवूडचे पावर कपल परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये (The Great Indian Kapil Show) दिसले. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा कपिल शर्माने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या. तसेच या शोमध्ये अनेक खुलासे देखील कळतनकळत करण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार, राघव चड्ढा मुलाखतीत म्हणतो की, "लग्नानंतर मला आईने लगेच मुलं करण्याचा सल्ला दिला होता." यावर कपिल शर्मा म्हणतो की, "लवकर प्लॅन करा..." त्यावर राघव चड्ढा हसत हसत म्हणतात की, "देंगे..आपको जल्दी गुडन्यूज देंगे…" राघव चड्ढा यांचे हे वाक्य ऐकताच परिणीती चोप्रा दचकते आणि हूस लागते. यावर कपिल विचारतो की, "गुड न्यूज येणार आहे का? लाडू वाटायला सुरुवात झाली का?" यावर पुन्हा राघव चड्ढा हसत "देंगे…कभी तो देंगे... " असे म्हणतात. यामुळे सोशल मीडियावर परिणीती चोप्राच्या प्रेगन्सीच्या चर्चांना उधाण आले आहे.

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर 2023 ला झाले. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यांनी थाटामाटात शाही पद्धतीने लग्न केले. गेल्या खूप काळापासून परिणीती चोप्रा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता राघव चड्ढा यांच्या बोलण्याने चर्चांना उधाण आले आहे.

परिणीती चोप्रा वर्कफ्रंट

परिणीती चोप्राला 'इशकजादे' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी,दावत ए इश्क आणि अमर सिंह चमकीला असे अनेक चित्रपट आहेत. चाहते आता परिणीती चोप्राच्यास आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

परिणीती चोप्रा- राघव चड्ढा कोणत्या शोमध्ये आले?

द ग्रेट इंडियन कपिल शो

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नगाठ कधी बांधली?

24 सप्टेंबर 2023

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT