Parineeti Chopra-Raghav Chadha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra's Grand Welcome: लग्न झालं आता कामाला लागा...; गृहप्रवेशानंतर 'राघनिती'चा व्हिडीओ व्हायरल

Raghav Chadha House : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parineeti Chopra's Welcome In Chadha's Family :

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. शाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला. लग्नाचे अनेक फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले. लग्नानंतर आता परिणीतीच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. त्यांच्या या लग्नसोहळ्यात अनेक देशातील बडे राजकारणी आणि बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यातच आता परिणीतीच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर आला आहे.

चड्ढा कुटुंबियानी नवीन सूनेचं जंगी स्वागत केलं आहे. या व्हिडिओत संपूर्ण कुटुंब उपस्थित असल्याचे दिसत आहे. परिणीतीने माप ओलांडून घरात प्रवेश केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर राघव चड्ढा आणि परिणीतीला काही प्रश्न विचारले गेले. सर्वात आधी 'आय लव्ह यू' कोणी म्हटलं असा प्रश्न विचारल्यावर दोघांचाही परिणीतीकडेच बोट दाखवले गेले. असे अनेक प्रश्न या दोघांना विचारले होते. व्हिडिओत परिणीतीने आपल्या हाताचे ठसे भिंतींवर उमटवल्याचेही दिसत आहे.

त्यानंतर परिणीतीला काम करायला लावण्याचा एक विधी पार पडला. यात राघव चड्ढा तिला काम करायला लावत असल्याचे दिसले. ही त्यांच्या घरची प्रथा आहे. यासोबतच लग्नानंतर अंगठी शोधाण्याचा विधी पार पडला. यात राघव चड्ढा आणि परिणीती कुंकवाच्या पाण्यात अंगठी शोधताना दिसले. व्हिडिओत चड्ढा कुटुंबियानी परिणीतीचे खूप कौतुक केल्याचे दिसत आहे.

व्हिडिओच्या शेवटी परिणीतीने सासरच्या कुटुंबियांचे खूप कौतुक केले. 'ही जगातील बेस्ट फॅमिली आहे. त्यांनी मला क्वीन असल्यासारखे वागवले'. असं परिणीती म्हणाली. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

याआधीही परिणीतीने लग्नाआधीचे समारंभाचे व्हिडिओ शेअर केले होते. यात त्यांनी संगीत खूर्ची, क्रिकेट असे वेगवेगळे खेळ खेळले होते. परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, परिणीतीचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट 'मिशन राणीगंज' रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT