बॉलिवूड अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. परेश रावल हे कॉमेडी कलाकार आहेत. त्यांनी नुक्त्याच दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत सांगितले की, त्यांनी गुडघेदुखीचा त्रास होता आणि त्या त्रासातून लवकर बरं होण्यासाठी त्यांनी 15 दिवस स्वतःची लघवी प्यायली (Drink Their Own Urine) आहे.
परेश रावल यांनी सांगितले की, त्यांना लघवी पिण्याचा सल्ला एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांनी दिला होता. परेश रावल यांनी 15 दिवस स्वतःची लघवी बिअरसारखी प्यायली आहे. परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितले की, "सनी देओलच्या 'घातक' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे वीरू देवगन (Veeru Devgan) यांनी मला स्वतःची लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. मी गुडघे दुखीमुळे खूप त्रस्त झालो होतो. त्यामुळे मी त्यांचा सल्ला ऐकला होता. यामुळे माझ्या गुडघ्यांना आराम देखील मिळाला होता. "
वीरू देवगन यांनी परेश रावल यांना सकाळी सर्वात आधी स्वतःची लघवी पिण्यास सांगितले होते. ही बातमी ऐकताच सर्वत्र सोशल मीडियावर याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. परेश रावल यांनी सांगितले की, "वीरू देवगन यांनी मला दारू, मटण, तंबाखू खाऊ नको असे देखील सांगितले. त्यांनी मला फक्त साधे जेवण आणि स्वतःची लघवी पिण्यास सांगितले."
पुढे परेश रावल म्हणाले की, "मी स्वतःचीच लघवी बिअरसारखी प्यायचो. मी असे तब्बल 15 दिवस केले आहे. जेव्हा मी एक्स-रे रिपोर्ट काढला तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला ते म्हणाले की, गुडघा बरा होण्यासाठी जवळपास 2 ते अडीच महिने लागतात. पण तुम्ही दीड महिन्यांतच बरे झालात."
परेश रावल लवकरच 'भूत बांगला' आणि 'हेरा फेरी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे दोन्ही चित्रपट कॉमेडी आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमार झळकणार आहे. त्यामुळे परेश रावल आणि अक्षय कुमारची जोडी पुन्हा प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.