Frequent Urination: वारंवार लघवी होणं कोणत्या समस्येचे संकेत? Urine च्या रंगावरून जाणून घ्या आरोग्याचं रहस्य

Frequent Urination Problem: वारंवार लघवीला जाण्याचा त्रास अनेकांना होतो. अनेकजण यामागचं कारण जास्त पाणी पिणं असल्याचं समजतात. मात्र, हे केवळ एक कारण असू शकतं. काही वैद्यकीय कारणांमुळेही लघवीला वारंवार जाण्याची समस्या उद्भवू शकते.
Frequent Urination Problem
Frequent Urination Problemsaam tv
Published On

वारंवार लघवीला जाण्याच्या सवयीने अनेकजण त्रासलेले असतात. अनेकदा लोक वारंवार लघवी होण्याची समस्या जास्त पाणी पिण्यामुळे होते असं मानतात. परंतु अनेक वैद्यकीय परिस्थितींमुळे वारंवार लघवी होण्या देखील एक समस्या असू शकते. जर एखादी व्यक्ती दिवसातून ७-८ वेळा लघवी करत असेल तर ही समस्या उद्भवू शकते. वारंवार लघवी होणं आणि लघवीचा रंग बदलणं हे अनेक आजार दर्शवतं. यामागे नेमकं कोणती कारणं असू शकतात ते पाहूयात.

वारंवार लघवी होण्याची कारणं

मधुमेह

मधुमेह हा आजार रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे होतो. मधुमेहामुळे एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवी करण्याची समस्या उद्भवू शकते.

Frequent Urination Problem
High cholesterol: खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चालताना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या

प्रोस्टेट कंडीशंस

वाढलेल्या प्रोस्टेटमुळे देखील सतत लघवीची समस्या उद्भवू शकते. प्रोस्टेटच्या समस्यांमुळे वारंवार लघवी होत असल्यास तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.

गर्भधारणा

गर्भधारणेदरम्यान महिलांना वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते. गर्भात जीव असल्यामुळे मूत्राशयावर दाब येतो आणि वारंवार लघवी होऊ लागते.

Frequent Urination Problem
Weight By Age: वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे?

कॅफेनचं अधिक सेवन

काही लोकं चहा आणि कॉफीचं सेवन अधिक करतात. जास्त प्रमाणात कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने वारंवार लघवी होऊ शकते.

लघवीच्या रंग सांगेल आजाराची माहिती (Urine Color And Diseases)

  • जर लघवी स्वच्छ होत असेल तर ते जास्त पाणी पिण्यामुळे असू शकते. जर लघवी हलकी पिवळी असेल तर तुम्ही कमी पाणी पीत आहात.

  • जर लघवीचा रंग काहीसा नारंगी असेल तर याचा अर्थ जीवनसत्त्वं आणि औषधं अधिक प्रमाणात शरीरात जातायत. गडद नारिंगी लघवी यकृताच्या समस्या दर्शवते.

Frequent Urination Problem
Liver Cancer: लिव्हर कॅन्सर झाल्यावर शरीरात दिसून येतात 'हे' बदल; वेळीच ओळखा
  • जर लघवीचा रंग हलका गुलाबी किंवा लाल असेल तर ते लघवीमध्ये रक्ताचे लक्षण आहे. कधीकधी हे अन्न किंवा बीटरूटच्या जास्त सेवनामुळे होऊ शकते.

  • लघवीमध्ये तुम्हाला फेस दिसत असेल तर ते युटीआय म्हणजेच युरीनरी ट्रॅक इन्फेक्शनचं लक्षण मानलं जातं.

  • लघवी गुलाबी किंवा लाल असेल तर ते लघवीमध्ये रक्ताचे लक्षण आहे. कधीकधी हे अन्न किंवा बीटरूटच्या जास्त सेवनामुळे होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com