Paresh Rawal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal : बाबुरावचं धमाकेदार कमबॅक, परेश रावल 'हेरा फेरी 3'मध्ये झळकणार

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' चित्रपटात परेश रावल यांची पुन्हा धमाकेदार एन्ट्री झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'हेरा फेरी 3'च्या (Hera Pheri 3) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैयाची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3'मध्ये बॉलिवूड अभिनेते परेश रावल हे बाबुरावच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3'मधून एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहते प्रचंड नाराज होते. क्रिएटिव्ह मतभेदांमुळे परेश रावल यांनी चित्रपट सोडला होता. असे बोले गेले होते.

नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले की, "आमच्यातले सर्व वाद मिटले आहेत. मी 'हेरा फेरी 3'चा भाग आहे. मी चित्रपटात बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र साकारणार आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही आहे. 'हेरा फेरी' सारखा सिनेमा एकदाच बनतो. सतत तसेच केल्यास त्यात नवीनपणा राहत नाही. जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट आवडते तेव्हा ती अधिक काळजी पूर्वक करावी लागते. आपण प्रेक्षकांना गृहीत धरू शकत नाही. त्यामुळे चांगला चित्रपट तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. "

पुढे परेश रावल (Paresh Rawal) म्हणाले की, "आम्ही सर्व एकत्र येऊ, मेहनत करू. सर्व प्रोब्लेम सुटले आहेत. 'हेरा फेरी 3' नक्की येत आहे. येथे सगळेच क्रिएटिव्ह लोक असल्यामुळे जरा एकमेकांना फाइन ट्यून करावे लागते. अक्षय, सुनील आणि प्रियदर्शन हे सर्वच माझे मित्र आहेत. "

'हेरा फेरी 3' चित्रपट

'हेरा फेरी 3' हा चित्रपट 'हेरा फेरी' फॅन्चायजीचा तिसरा भाग आहे. 'हेरा फेरी' चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2006ला 'फिर हेरा फेरी' चित्रपट रिलीज करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3' नवीन वर्षात 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'हेरा फेरी 3' साठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छावाचे विजय घाडगे मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीचे सुरज चव्हाणसह 10 आरोपींना अटक

Tmkoc: बाबो! इतक्या वर्षाची झाली 'तारक मेहता' फेम दया भाभी; खरं रूप पाहून आश्चर्य वाटेल

Genelia Deshmukh: जेनियाचं सौंदर्य पाहू वेड लागलं, फोटो एकदा पाहाच

Kitchen Hacks: पावसाळ्यात मीठ भिजण्यापासून संरक्षण कसे करावे? जाणून घ्या सोप्या उपाय

Vastu Shastra: जेवताना तुम्हीही टीव्ही-मोबाईल पाहता का? वास्तु शास्त्र सांगतं थांबा...! नकळत तुम्ही करताय 'या' चुका

SCROLL FOR NEXT