Suniel Shetty On Here Pheri 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty: 'हेरा फेरी 3' मधून परेश रावलची एक्झिट; सुनील शेट्टी म्हणाला,'परेश रावलशिवाय हा चित्रपट...'

Suniel Shetty On Here Pheri 3: बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते.

Shruti Vilas Kadam

Suniel Shetty On Here Pheri 3: बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होती. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीत अचानकच मोठा वळण आले आहे. बाबूभाईया म्हणून ओळखले जाणारे परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधून माघार घेतल्याची बातमी समोर आली आहे. या निर्णयाने चाहत्यांमध्ये आणि सहकलाकारांमध्येही खळबळ उडाली आहे.

अभिनेता सुनील शेट्टी, जो 'हेरा फेरी'मध्ये श्यामची भूमिका साकारतो, त्यांने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांने ANI शी बोलताना सांगितले की, "हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे आणि मी पूर्णपणे हताश झालो आहे. जर अशी एक फिल्म असेल ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, तर ती 'हेरा फेरी' होती. ही फिल्म 100% परेश रावलशिवाय बनू शकत नाही."

या प्रकरणात आणखी एक वळण म्हणजे अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊस 'केप ऑफ गुड फिल्म्स'ने परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मागण्यात आली आहे. परेश रावल यांनी त्यांच्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले नाही, परंतु काही अहवालांनुसार, त्यांनी अधिक मानधनाची मागणी केली होती, जी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी चित्रपटातून माघार घेतली.

'हेरा फेरी' फ्रँचायझीतील त्रिकूट - अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते. त्यामुळे या त्रिकुटातील कोणताही बदल चाहत्यांसाठी निराशाजनक ठरू शकतो. आता या वादामुळे 'हेरा फेरी 3' होणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT