Aatmapamphlet Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: शाळेतल्या प्रेमाची छोटुकली कहाणी; 'आत्मपॅम्फ्लेट'च टीझर प्रदर्शित

Aatmapamphlet Movie: 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

Pooja Dange

Aatmapamphlet Teaser Released:

आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मपरीक्षण हे शब्द आपण ऐकले आहेत. पण आता एक नवीन शब्द आणि चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे. 'आत्मपॅम्फ्लेट', हे वाचून नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल.

'आत्मपॅम्फ्लेट' म्हणजे छोटीशी आत्मकथा. परेश मोकाशी आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. तर नुकताच आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाचा टीझर आपल्या भेटीला आला आहे.

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाच्या टीझरची सुरुवात शाळेतील मुलांपासून होते. हे कथा किशोर वयातील मुलाची आहे. त्याचे पहिले प्रेम या टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. तर एव्हरग्रीन गाणे 'धीरे-धीरे मेरे जिंदगी में आना' मराठीत करून टीझरमध्ये वापरण्यात आले आहे.

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ला प्रदर्शित होणार आहे. वाळवी चित्रपटाच्या यशानंतर परेश मोकाशी यांचा हा पहिला चित्रपट आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी म्हणतात, 'आत्मपॅम्फ्लेट म्हणजे आपल्या शालेय आयुष्यात, क्वचितच येऊन गेलेला सोप्पा पेपर आहे. आपल्यासारख्या छोटुकल्या लोकांच्या चरित्रातील ही टीन ऐजची पाने तशी खूप खळबळजनक असतात. त्या वयात आपल्या मनात, जनात, कुटुंबात, देशात खळबळच खळबळ उडालेली आपल्याला दिसत असते. या खळबळीचा हा निखळ आनंद देणारा खेळ!'' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?

Digital eye strain symptoms: डिजिटल स्क्रीनची सवय ठरतेय डोळ्यांसाठी घातक; दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतोय

Lucky Zodiac Ring: राशीनुसार कोणत्या धातूची अंगठी घालावी? जाणून घ्या शुभ धातू

Maharashtra Live News Update: बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार, अजित पवार एकत्र

Diwali 2025 OTT Release: या दिवाळीत OTT वर होणार मोठा धमाका; 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT