Lee Sun-kyun  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lee Sun-kyun Died: 'पॅरासाइट' फेम ली सन क्यूनचा ४८ व्या वर्षी मृत्यू, कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Priya More

Parasite Fame Actor Lee Sun Kyun Died:

ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाइट' फेम अभिनेता ली सन-क्यूनचा (Lee Sun-kyun) बुधवारी मृ्त्यू झाला. हा अभिनेता 48 वर्षांचा होता. अभिनेत्याचा त्याच्या कारमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ली सन क्यूनने आत्महत्या (Lee Sun-kyun Died) केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणात अभिनेत्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ली सन क्यून सोलच्या सेओंगबुक जिल्ह्यात त्याच्या कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या अभिनेत्यावर ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी खटला सुरू होता. स्थानिक पोलिसांना या प्रकरणात अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. या अभिनेत्याने ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा वापर केल्याचाही संशय व्यक्त केला जात होता.

पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान ली सन क्यूनच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ४८ वर्षीय ली सन क्यूनने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय असून ते तपास करत आहेत. ली सन क्यूनच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे. ली सन क्यूनच्या मृत्यूच्या एक दिवस आधी पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात त्याची चौकशीही केली होती.

पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान ली सन क्यूनने कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे सांगितले होते. यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला. दक्षिण कोरियाच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, एका महिलेने पोलिसांना फोन केला आणि सांगितले की तिचा पती सुसाईड नोट लिहून घरातून निघून गेला आहे. तिची कारही घरी नसल्याची माहितीही महिलेने दिली होती. यानंतर पोलिसांनी कारमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख ली सन क्यून म्हणून केली.

पोलिसांना अभिनेत्याच्या कारमध्ये जळलेल्या कोळशाच्या ब्रिकेट सापडल्या आहेत. या पुराव्याच्या आधारे ली सन क्यूनने आत्महत्या केल्याचा संशय आहे. ऑक्टोबरमध्ये अभिनेत्यावर अवैध ड्रग्सचा वापर केल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ली सन क्यून हा दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेता होता. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT