Param Sundari Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Param Sundari Collection : 'परम सुंदरी'ची जादू फेल; पहिल्याच सोमवारी कमाईत घसरण, कलेक्शनचा आकडा किती?

Param Sundari Box Office Collection Day 4 : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. मात्र चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी 'परम सुंदरी' कडे पाठ फिरवली आहे.

Shreya Maskar

'परम सुंदरी' चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'परम सुंदरी'तील सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली.

'परम सुंदरी' ही एक प्रेमकथा आहे.

सध्या थिएटरमध्ये चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. 'वॉर 2' आणि 'कुली'नंतर आता 'परम सुंदरी'ची धुम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. मात्र रिलीजच्या चौथ्या दिवशीच सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'परम सुंदरी' (Param Sundari) जादू फेल झालेली पाहायला मिळत आहे. 'परम सुंदरी' चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे. परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार जलोटा आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते. 'परम सुंदरी' चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करणार आहे. मात्र सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या सोमवारी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • पहिला दिवस - 7.25 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 9.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 10.25 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 3.50 कोटी रुपये

  • एकूण कलेक्शन - 30.25 कोटी रुपये

'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2'चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 235.1 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर सोमवारी चित्रपटाने 0.60 कोटी कमावले आहेत.

'कुली' बॉक्स ऑफिस कलेक्शन

रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 280.20 कोटींची कमाई केली आहे. तर सोमवारी फक्त 1.10 कोटी रुपये कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT