Kushal Badrike Video
Kushal Badrike SAAM TV

Kushal Badrike : वडिलांचा फोटो हातात घेऊन आईने सिनेमा पाहिला, कॉमेडी किंग वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला

Kushal Badrike Video : मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या पहिल्या चित्रपटाची आठवण सांगितली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
Published on
Summary

कुशल बद्रिकेने आपल्या कॉमेडी शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

कुशलने आपल्या पहिल्या चित्रपटाची आठवण सांगितली आहे.

कुशलच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले.

कॉमेडी किंग कुशल बद्रिकेने (Kushal Badrike ) कायम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तो 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात पाहायला मिळत आहे. अशात आता कुशल बद्रिकेचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी पहिल्या सिनेमाची आठवण सांगितली आहे.

व्हिडीओमध्ये कुशल म्हणतो की, 'जत्रा' हा माझा पहिला चित्रपट...सिनेमाचे शूटिंग 2005 मध्ये झाले. पेमेंटचे बोलण्यासाठी मी ऑफिसमध्ये गेलो. काम 30 दिवसांचे होते. 3 हजार रुपये मिळतील सांगितले. मी तेव्हा या क्षेत्रात नवा होतो. किती पैसे सांगायचे हे मला माहित नव्हते. मला वाटले, दिवसाचे 3 हजार तर 30 दिवसांचे 90 हजार मिळणार. 2005 मध्ये एवढी मोठी रक्कम पाहून मला आनंद झाला. मी पेपरवर सही केली. पण मला नंतर समजले की, दिवसाचे 3 हजार नव्हे, तर 30 दिवसांसाठी 3 हजार रुपयांचे ते पॅकेज होते. ज्यात शूटिंग-डबिंग सर्वकाही होते.

पुढे कुशल म्हणाला, "मी मित्राला सर्व सांगितले. तो म्हणाला, सध्या चित्रपटात काम करण्यासाठी लोक पैसे देत आहेत आणि तुला पहिल्याच चित्रपटात मोठी भूमिका मिळाली आहे. तर चित्रपट कर. चित्रपटाचे पहिले शेड्यूल संपताच माझ्या वडिलांचे निधन झाले. पुढचे शेड्यूल बाकी होते. त्यामुळे पुढे कंटिन्युटी करता मी वडील गेले असतानाही मुंडन केले नाही. शेवटी सिनेमा रिलीज मी आणि आई चित्रपट पाहायला बसलो. माझे स्क्रिनवर मोठे नाव आले. मी मागे वळून पाहिले तर आई माझ्या वडिलांचा फोटो हातात घेऊन चित्रपट पाहत होती.  'जत्रा' चित्रपटात जे जे कलाकार होते, ते आज मराठीमध्ये सुपरस्टार आहेत."

महाराष्ट्राला हसावणारा कुशल वडीलांची ही आठवण सांगताना खूप भावुक झाला. त्याला अश्रू अनावर झाले. 2005 मध्ये  'जत्रा' मराठी चित्रपट रिलीज झाला. आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना तुफान आवडतात. 'जत्रा' चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, मुनीर बागमान, भरत जाधव, अंकुश चौधरी, विजय चव्हाण आणि उपेंद्र लिमये असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळाले.

Kushal Badrike Video
Bigg Boss 19 : कुनिकाच्या हातातून गेली कॅप्टन्सी; 'या' सदस्याने मारली बाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com