Beed Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपाला वेग, SIT चे पथक बीडमध्ये तळ ठोकून; भाऊ अन् वडिलांचा जबाब नोंदवला

Beed Mahadev Munde : बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात नव्या एसआयटीकडून तपास वेगाने सुरू असून, मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे आणि भाऊ अशोक मुंडे यांची आंबेजोगाईत दोन तास सखोल चौकशी करण्यात आली.
Mahadev Munde Case
Mahadev MundeSaam Tv
Published On
Summary
  • महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास नव्या एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

  • आंबेजोगाईत दोन तास महत्त्वपूर्ण चौकशी झाली, वडील व भावाचा जबाब नोंदवला गेला.

  • या चौकशीतून आरोपींबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • हत्या प्रकरणातील मुख्य हेतू आणि मागील वैर यांचा शोध घेण्यात तपास अधिकारी व्यस्त आहेत.

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे.

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकात हत्या करण्यात आली. ही घटना घडून बराच कालावधी उलटून गेला आहे. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून अद्यापही त्यांचा मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी जुनी SIT काढून नवीन SIT पथक गठीत करण्यात आलं होत. नव्या एसआयटीचे प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची सखोल चौकशी करण्यात आली.

Mahadev Munde Case
Mahadev Munde Case: गोट्या गितेवर राजकीय वरदहस्त? अजित पवारांच्या नेत्यासोबत जेवतानाचा VIDEO समोर

ही कारवाई आंबेजोगाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात पार पडली. तब्बल दोन तास ही चौकशी चालली. चौकशीदरम्यान पोलीस निरीक्षक संतोष सावळे, निरीक्षक भार्गवकर आणि सपकाळ हे अधिकारीही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, या चौकशीदरम्यान दोघांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात आणि तेच आरोपींपर्यंत पोहोचण्यास कळीची भूमिका बजावू शकतात. महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

Mahadev Munde Case
Beed Mahadev Munde : महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, एसआयटी गठीत

या प्रकरणातील नेमका हेतू, गुन्ह्यातील संभाव्य सहभाग आणि मागील वैर यांचा तपास सध्या एसआयटी करत आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या एसआयटीचे पथक आंबेजोगाईत तळ ठोकून असून, प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी केली जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी काही साक्षीदार आणि संशयितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महादेव मुंडे यांची हत्या नेमकी कुणी, का केली याचा छडा लावण्यासाठी एसआयटीकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

Q

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

A

सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी करत आहे.

Q

महादेव मुंडे यांचा मारेकरी सापडला आहे का?

A

नाही, अद्याप मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

Q

कोणाची चौकशी करण्यात आली?

A

महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे आणि भाऊ अशोक मुंडे यांची एसआयटीकडून सखोल चौकशी करण्यात आली.

Q

चौकशी कुठे झाली?

A

ही चौकशी आंबेजोगाई येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com