Panchayat Season 4 Cast Fees Saam Tv
मनोरंजन बातम्या

Panchayat Season 4 Cast Fees: सचिवजी मंजू देवी की प्रधानजी; 'पंचायत ४' साठी सर्वात जास्त फी कोणी घेतली?

Panchayat Season 4: अमेझॉन प्राइम व्हिडिओची सर्वात यशस्वी वेब सिरीज 'पंचायत'चा चौथा सीझन प्रदर्शित झाला आहे. फुलेरा गावातील प्रत्येक पात्राचे मानधन किती ते जाणून घेऊयात

Shruti Vilas Kadam

Panchayat Season 4 Cast Fees: टीव्हीएफची 'पंचायत' ही भारतीय प्रेक्षकांची आवडती वेब सिरीज आहे, जी पुन्हा एकदा तिच्या चौथ्या आणि धमाकेदार सीझनसह परतली आहे. या सीझनमध्ये क्रांती देवी आणि मंजू देवी यांच्यात प्रधान बनण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पंचायतच्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

पंचायत ४ ची कथा लोकांना थोडी कंटाळवाणी वाटली असली, तरी या मालिकेतील स्टारकास्ट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. जितेंद्र कुमारने या सीझनमध्ये सचिवाची भूमिका साकारली होती, तर रघुबीर यादव प्रधान म्हणून प्रसिद्ध झाले. मंजू देवीपासून ते प्रल्हाद चा आणि विकास-रिंकीपर्यंत, सर्वजण आता प्रत्येक घरात प्रसिद्ध झाले आहेत. 'पंचायतच्या या सीझनसाठी सर्वात जास्त पैसे कोणी घेतले ते जाणून घेऊया.

पंचायत ४ साठी या अभिनेत्याला सर्वाधिक फी मिळाली

पंचायत ४ साठी सचिव म्हणजे जितेंद्र कुमार यांना सीझन 4 साठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. बातमीनुसार, जितेंद्र कुमार उर्फ ​​अभिषेक त्रिपाठी यांनी 'पंचायत सीझन 4' च्या प्रत्येक भागासाठी 70000 रुपये आकारले आहेत. म्हणजेच संपूर्ण सीझनसाठी त्याची एकूण फी सुमारे 5 लाख 60000 आहे.

जितेंद्र कुमारनंतर, दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मानधन आकारणारी अभिनेत्री नीना गुप्ता आहेत, ज्यांनी संपूर्ण सीझनसाठी 4 लाख रुपये आकारले आहेत, त्यांची प्रत्येक एपिसोडची फी 50 हजार होती. तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे ऑनस्क्रीन पती आणि फुलेराचे प्रधान उर्फ ​​रघुवीर यादव आहेत ज्यांनी मालिकेसाठी प्रति एपिसोड सुमारे 40,000 रुपये आणि संपूर्ण सीझनसाठी 3,20,000 रुपये आकारले.

प्रल्हाद चाने प्रत्येक एपिसोडसाठी २०,००० रुपये घेतले आणि संपूर्ण ८ एपिसोडसाठी त्याचे मानधन १,६०,००० रुपयांपर्यंत पोहोचले, तर चंदन रॉय उर्फ ​​विकासनेही फैसल मलिकने १,६०,००० रुपये इतकेच मानधन घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT