Dhurandhar Viral Video: धुरंधर या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरत आहे. त्याच्या गाण्यांनी, विशेषतः त्याच्या शीर्षकगीताने, लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांना धक्क केले आहे. हा व्हिडिओ भारतातील नाही तर पाकिस्तानमधील एका लग्नातील आहे. लग्नात काही मित्रांनी धुरंधरच्या प्रसिद्ध गाण्यावर एक जबरदस्त डान्स सादर केले यामुळे प्रेक्षक थक्क झाले. हा डान्स काही तासांतच इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला. लोक म्हणत आहेत की धुरंधरने भारत आणि पाकिस्तानमधील अंतरही कमी केले आहे, कारण दोन्ही देशांचे लोक एकाच गाण्यावर नाचत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील एका लग्नातील डान्स दिसत आहे. काळ्या पोशाखात तीन मुलांनी 'ना दे दिल परदेसी नु' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. लग्नात येणारे पाहुणे टाळ्या वाजवताना आणि त्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ काढतानाही दिसत आहेत. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली ही क्लिप लवकरच व्हायरल झाली आणि लाखो व्ह्यूज मिळाले.
भारत आणि पाकिस्तानमधील नेटकरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. बरेच नेटकरी म्हणत आहेत की हा डान्स खूप मस्त आहे. एकाने कमेंट केली, गाण्याचे मालक मेजर मोहित कुमार शर्मा. तर, आणखी एकाने लिहीले, ब्रॉडर पार धुरंधरची धूम
धुरंधर चित्रपटाबद्दल
धुरंधर या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारख्या प्रमुख कलाकारांच्या भूमिका आहेत. अॅक्शन, हेरगिरी आणि राजकारणाचे मिश्रण आहे. ही कथा हमजा अली मजारी या भारतीय गुप्तहेराभोवती फिरते, जो पाकिस्तानच्या अंडरवर्ल्ड आणि राजकीय परिदृश्यात घुसखोरी करण्यासाठी गुप्त मोहिमेवर जातो. अक्षय खन्ना रहमान नावाच्या दरोडेखोराची भूमिका साकारली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.