Abir Gulaal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

Pakistani Actor Fawad Khan: सलग अनेक तारखा पुढे ढकलण्यात आल्यानंतर, अखेर हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट अबीर गुलाल भारतात प्रदर्शित होणार नाही.

Shruti Vilas Kadam

Pakistani Actor Fawad Khan: पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. २२ एप्रिल रोजी भारतात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा चित्रपट अडचणीत आला होता. भारतीय चित्रपटगृहांमध्ये त्याचे प्रदर्शन ९ मे रोजी होणार होते. पण, पहलगाम हल्ला आणि लोकांच्या विरोधामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि नंतर १२ सप्टेंबर रोजी तो भारताव्यतिरिक्त जगभरात प्रदर्शित झाला.

आता काही दिवसांपासून हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण आता पीआयबीच्या वृत्तानुसार, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या वाट पाहणारे निराश झाले आहेत.

'अबीर गुलाल' आता प्रदर्शित होणार नाही

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या अधिकृत एक्स हँडलने 'अबीर गुलाल'च्या भारतात प्रदर्शित होण्याबाबत एक नवीन ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये, रिपोर्ट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत यामध्ये भारतात अबीर गुलालच्या नवीन प्रदर्शन तारखेबद्दल लिहिले आहे. स्क्रीनशॉट शेअर करताना पीआयबीने लिहिले की, "अनेक माध्यमांकडून असा दावा केला जात होता की फवाद खान आणि वाणी कपूर यांचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. हा दावा खोटा आहे. चित्रपटाला अशी कोणतीही परवानगी मिळालेली नाही."

आंतरराष्ट्रीय खेळाडू

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता आणि सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून चित्रपटाची गाणी यूट्यूबवरून काढून टाकण्यात आली. दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने देखील पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणार असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT