Bhavani Shankar Died Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhavani Shankar: प्रसिद्ध तबलावादक भवानी शंकर याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Pakhawaj Maestro Pandit Bhawani Shankar: हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मुंबईतील राहत्या घरी भवानी शंकर यांची प्राणज्योत मालवली. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Priya More

Bhavani Shankar Passes Away:

भारतीय संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर येत आहे. संगीतकार आणि तबलाबादक पंडित भवानी शंकर (Bhavani Shankar) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पंडीत भवानी शंकर यांच्या निधनाची (Bhavani Shankar Passed Away) माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून पंडीत भवानी शंकर यांची ओळख होती. ३० डिसेंबर रोजी भवानी शंकर यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबीयांकडे केली. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यासाठी कुटुंबातील सदस्य प्रयत्न करतच होते. पण तेवढ्यात कुटुंबीयांच्या समक्षच त्यांनी प्राण सोडले. पंडित भवानी शंकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तबलावादक भवानी शंकर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. भवानी शंकर यांचा जन्म 1956 मध्ये संगीताशी संबंधित कुटुंबात झाला होता. भवानी शंकर वयाच्या ८ व्या वर्षांपासून तबला वाजवायला शिकले. तेव्हापासून ते भारतातील प्रसिद्ध तबलावादक म्हणून ओळखले जाऊ लागले.

दरम्यान, 31 डिसेंबर म्हणजे आज भवानी शंकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता मुंबईतल्या बोरिवली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भवानी शंकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संगीत जगतातील सर्व सेलिब्रिटी येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT