Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आएशा खानची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

Aayesha Khan Health Issue: या शोमधील स्पर्धक मुनव्वर फारुकीची (Munawar Faruqui) एक्स गर्लफ्रेंड आएशा खानला (ayesha khan) वीकेंड का वारमध्ये होस्ट सलमान खानने फटकारले. त्यानंतर रडता रडता ती चक्कर येऊ खाली पडली.
Aayesha Khan Health Issue
Aayesha Khan Health IssueSaam Tv
Published On

Bigg Boss 17 New Episode:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) यावेळीचा वीकेंड वॉर स्पेशल एपिसोडमध्ये चांगलाच गोंधळ झाला. असे बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाले. या शोमधील स्पर्धक मुनव्वर फारुकीची (Munawar Faruqui) एक्स गर्लफ्रेंड आएशा खानला (ayesha khan) वीकेंड का वारमध्ये होस्ट सलमान खानने फटकारले.

सलमानने आएशाला मुनव्वरबाबत खूप प्रश्न विचारले हे ऐकूनच आएशा रडू लागली. रडता रडता आएशा चक्कर येऊन खाली पडली. त्यानंतर मेडिकल एमर्जन्सीसाठी आएशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आएशाची अवस्था पाहून सलमान खानला देखील बिग बॉसच्या घरामध्ये जावे लागले.

वीकेंड का वार स्पेशल एपिसोडमध्ये, सलमान खानने मुनव्वर फारुकीच्या लोकप्रियतेचा वापर करून बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्याबद्दल आयशा खानला फटकारले. हा संपूर्ण वीकेंड मुनव्वर फारुकी आणि आएशा खान यांच्यातील संभ्रमाने भरलेल्या नात्यासाठी होता. सलमान खानने वीकेंड वॉर स्पेशल एपिसोडमध्ये आएशा खानला घरात येण्याचे कारण विचारले. त्यानंतर आएशा खान म्हणाली की, 'मला मुनव्वर फारुकीची माफी मागायची आहे.' ज्यावर सलमान खानने तिला प्रश्न केला की, 'ती घरात गेस्ट म्हणून येऊन किंवा घराबाहेर हे करू शकली असती.' तू या शोमध्ये स्पर्धक म्हणून का सहभागी झालीस?

यावेळी सलमान खानने मुनव्वर फारुकीच्या मागे घरातील इतर सदस्यांना सतत आएशा खानला तो आवडत नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. सलमान म्हणाला की, 'एकीकडे ती त्याच्यासोबत बसते आणि खेळते. त्याला वेळ देते. नंतर ती इतरांकडे जाते आणि त्यांना सांगते की घराबाहेर गेल्यावर ती त्याचे तोंडही पाहणार नाही. मग हे काय आहे? ती त्याचा वापर करत नाही का?' तसेच सलमान खानने मुनव्वार आणि आएशा या दोघांनाही विचारले की, 'ते एकमेकांवर प्रेम करतात का?' याला दोघांनीही नकार दिला. यानंतर सलमान खानने आएशा खानची चांगलीच शाळा घेतली. ज्यानंतर आएशा खान जोरजोरात रडू लागते. यावेळी आएशा खानला चक्कर येते आणि ती खाली पडते.

Aayesha Khan Health Issue
बॉलिवूडचे New Married Couples निघाले New Year Celebration ला, सिंपल लूकने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

आएशाला चक्कर आल्यानंतर घरातील इतर सदस्य देखील घाबरतात आणि ते बिग बॉसकडे डॉक्टर पाठवा अशी मागणी करतात. आएशचा परिस्थिती पाहून घरातील सदस्यांचा एकच गोंधळ उडतो. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये डॉक्टर येऊन आएशाची तपासणी करतात. हा एपिसोड खूपच गोंधळाचा ठरला आहे. याआधीही आयशा खान अनेकवेळा घरात बेशुद्ध पडली होती. पण त्यावेळी घरातील बाकीच्या सदस्यांची रिअॅक्शन अशी दिसली नव्हती. आयशा खानची बिघडलेली स्थिती पाहून सलमान खानला स्वतः घरात येऊन कुटुंबातील इतरांना शांत करावे लागले.

Aayesha Khan Health Issue
Country of Blind: काश्मीरच्या स्थानिक कलाकारांची कमाल; आंधळे बनवून 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ला उतरवलं ऑस्करच्या शर्यतीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com