Paatal Lok Season 2 Teaser Out Google
मनोरंजन बातम्या

Paatal Lok Season 2 Teaser : 'खेल अभी बाकी है….'; रक्तरंजित आणि भीतीदायक 'पाताल लोक 2' येतोय 'या' दिवशी

Paatal Lok Season 2 Teaser Out: प्राइम व्हिडीओच्या पाताल लोक या वेब सिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी पाताळ लोक 2 चा टीझर शेअर करून घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paatal Lok Season 2 Teaser: पाताल लोक ही वेब सिरीज सर्वांनाच खूप आवडली होती. कथेत सस्पेन्स, ड्रामा आणि थ्रिलर पाहायला मिळाले. पाताळ लोकच्या दुसऱ्या सीझनची बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना प्रतीक्षा होती. आता निर्मात्यांनी पाताळ लोक 2 च्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. Amazon प्राइम व्हिडिओचा पाताल लोक सीझन 2 17 जानेवारी 2025 रोजी प्रीमियर होणार आहे. एवढेच नाही तर निर्मात्यांनी पाताल लोक 2 चा टीझर देखील शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की यावेळी हा सीझन पूर्वीपेक्षा जास्त रक्तरंजित होणार आहे.

पाताल लोक २ च्या टीझरमध्ये फक्त अभिनेता जयदीप अहलावत दिसत आहे. अभिनेता एक छोटी कथा सांगताना दिसतो. मात्र, त्याने सांगितलेल्या कथेवरून अंदाज बांधता येतो की, यावेळी या भागात अनेक सस्पेन्स पाहायला मिळणार आहेत. जयदीपने एका माणसाला चावणाऱ्या कीटकाची कथा सांगितली. तो माणूस त्याला मारतो आणि तो लोकांच्या नजरेत हिरो बनतो. त्यानंतर एक दिवस पुन्हा कीटक येतो, पण यावेळी एक नव्हे तर हजारो कीटक येतात. जयदीपचा आवाज हा टीझर पासून अंगावर काटा येत आहे.

पाताल लोक 2 चा टीझर

पाताल लोक 2 च्या टीझर पोस्ट करताना लिहिले, पी फॉर पाताल लोक, नवीन सीझन, 17 जानेवारीला. या टीझरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाताल लोक २ च्या टीझरवर प्रेक्षक कमेंटचा वर्षाव करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, नरकाची सफर. एका यूजरने लिहिले, पाताल लोकमध्ये आपले स्वागत आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, मला इतकी भीती का वाटते?

काही लोक पाताल लोक 2 च्या ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारताना दिसले तर काही लोकांनी जयदीप अहलावतच्या अभिनयाचे कौतुक केले. मात्र, या वेब मालिकेच्या प्रीमियरला अवघे १४ दिवस उरले आहेत. सुदीप शर्मा यांनी ही मालिका बनवली आहे. प्राइम व्हिडीओ शोच्या पहिल्या सीझनमध्ये अहलावत हथीरामच्या भूमिकेत दिसले होते, एक धूर्त दिल्ली पोलीस अधिकारी जो एका प्राइम टाइम पत्रकाराच्या हत्येच्या प्रयत्नाच्या संबंधात चार संशयितांना पकडतो. मात्र, हथीराम प्रकरणाच्या खोलात जात असताना तो स्वतःच एका धोकादायक जगात अडकतो. आता सीझन २ मध्ये कथा काय वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT