नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधूम आहे. उद्या संपूर्ण भारतात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे. दसऱ्यानिमित्त उद्या अनेकांना सुट्टी असेल. हे सुट्टी कशी घालवायची याचा प्रत्येकाचा प्लॅन झालाच असेल.
या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म देखील सज्ज आहेत. आम्ही तुमच्यासोबत या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरीज यादी शेअर करणार आहोत. जर तुमचा काही प्लॅन नसेल तर बिंज वॉच करून तुम्ही सुट्टीच सदुपयोग करू शकता.
दुरंगा सीजन २
दुरंगा रोहित सिप्पी दिग्दर्शित एक सायकोलॉजिकल ड्रामा आहे. अमित साध, गुलशन देवैया आणि दृष्टी धामी या वेबसीरीजमध्ये मुळ्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या सीजनमध्ये एका सिरीयल किलरची कथा दाखविण्यात आली आहे. ही वेबसीरीज ८ एपिसोडची आहे. दुरंगा झी ५ वर प्रसारित होणार आहे.
परमपोरुल
हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला हे. सी अरविंद राज दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आर सरतकुमार, अमिताभ प्रधान, करिश्मा परदेशी आणि बालाजी शक्तिवेल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओवर भेटीला येणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म टिव्हीएफचा हा दुसरा सीजन आहे. या सिजनमध्ये अभिलाष, गुरी आणि एसकेची कथा दाखविण्यात आली आहे. अभिलाष आयईएस झाला असून गुरी आणि एसकेचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. या वेबसीरीजमध्ये कस्तुरीया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थलियाल, सानी हिंदुजा आणि नमिता दुबे हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. ही वेबसीरीज अमेझॉन प्राईम व्हिडीओ प्रसारित होणार आहे.
या वेबसीरीजचे दिग्दर्शन श्रीजीत एन यांनी केले आहे. हा एक कॉमेडी फॅमिली वेबसीरीज आहे. या वेबसीरीजमध्ये नित्य मेनन प्रमुख भूमिकेत आहे. मल्याळम व्यतिरिक्त ही वेबसीरीज तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, बंगाली आणि हिंदी या भाषांमध्ये प्रेक्षकांना डिस्नी प्लस हॉटस्टारवर बघता येईल.
'बर्निंग बेट्रेयल' हा पोर्तुगीज चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
'लाईफ ऑफ आवर प्लॅनेट' ही डॉक्युमेंट्री सीरीज देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांचा चंद्रमुखी हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना 'चंद्रमुखी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर बघता येईल.
करण जोहर होस्ट करत असलेला 'कॉफी विथ करण'चा ८ वा सीजन डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. करण जोहरसह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात डोकविण्याची संधी पुन्हा प्रेक्षकांना मिळणार आहे. या शोच्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण येणार आहेत.
ट्रान्सफॉमर्सच्या या सीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा थेट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. ट्रान्सफॉमर्स या वेबसीरीजचा आनंद अमेझॉन प्राईम व्हिडीओवर घेता येणार आहे.
'लाँग लिव्ह लव्ह' हा थाय कॉमेडी चित्रपट आणि 'प्लूटो' हे जापनीज अॅनिमेशन वेबसीरीज देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होणार आहेत.
कॉबवेब एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आठ वर्षांच्या पीटरवर आधारित आहे. त्याला त्याच्या बेडरूमच्या भिंतीतून आवाज येतात. ही त्याच इमॅजिनेशन असल्याचे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात लिझी कॅप्लान, अँटोनी स्टारर, क्लियोपात्रा कोलमन आणि वुडी नॉर्मन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. लायंसगेट प्लेवर या चित्रपट पाहता येईल
स्कंद हा एक तेलुगु अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. राम पोथीनेनी, श्रीलीला, सई मांजरेकर आणि श्रीकांत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टारवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कॉनसेकेशन - प्राइम व्हिडिओ (इंग्रजी चित्रपट)
निखॉन्ज द सर्च बिगिंस - ZEE5 (बंगाली चित्रपट)
पेन हस्लर्स- नेटफ्लिक्स (इंग्रजी चित्रपट)
पेबल्स- सोनी लिव्ह (तामिळ चित्रपट)
सिस्टर डेथ- नेटफ्लिक्स (स्पॅनिश हॉरर फिल्म)
टोर - नेटफ्लिक्स (स्वीडिश वेबसीरीज)
यलो डोअर- 90's ली-फो क्लब- नेटफ्लिक्स, कोरियन डॉक्युमेंट्री
दक्षिण कोरियामधील टीव्ही शो आहे. या टीव्ही शोमध्ये एका मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. या मुलीला दिवा व्हायचे असते. परंतु तिचा अपघात होतो आणि तिचे जागाच बदलते. त्यानंतर 15 वर्षांनी ती परतते. हा टीव्ही शो नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.