John Cena Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Oscar Award 2024: ऑस्कर अवॉर्डच्या स्टेजवर नग्नावस्थेत पोहचला John Cena, अभिनेत्याने असं का केलं?

Priya More

John Cena Reached The Stage Naked:

जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर अवॉर्ड 2024ची (Oscar Award 2024) नुकताच घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी हा एक अवॉर्ड आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक कॅटेगरीसाठी हा अवॉर्ड देण्यात येत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये डब्ल्यूडब्ल्यूइचा (WWE) रेसलर आणि अभिनेता जॉन सीनाने (John Cena) असे काही कृत्य केले जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. अवॉर्ड प्रेझेंटर म्हणून स्टेजवर पोहोचलेला पण यावेळी त्याने कोणतेही कपडे घातले नव्हते. जॉन सीनाला अशा अवस्थेत पाहून अवॉर्ड शोला उपस्थित राहिलेले सर्वजण चकीत झाले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्वोत्कृष्ट पोशाखासाठी ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यासाठी जॉन सीना स्टेजवर आला. हा शो होस्ट करणाऱ्या जिमी किमेलने एका सेगमेंटसाठी जॉन सीनाला स्टेजवर बोलावले. तेव्हा तो कपडे न घालताच स्टेजवर आला. सोशल मीडियावर जॉन सीनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये जॉन सीना पूर्णपणे न्यूड असून त्याने त्याचे प्रायव्हेट पार्ट एका छोट्याशा पुठ्ठ्याने झाकले असल्याचे दिसत आहे. पडद्याआडून जॉन सीनाला नग्नावस्थेत येताना पाहून ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला आलेले सर्वजण हसू लागतात. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्कर शोमध्ये असे करून जॉन सीनाने पोशाखांचे महत्त्व सांगितले. जॉन सीनाला होस्ट जिमी किमेलने एका सेगमेंटसाठी स्टेजवर बोलावले होते ज्यामध्ये जॉनला नग्न दिसावे लागले होते. होस्ट जिमीने 50 वर्षांपूर्वी 1974 च्या ऑस्कर शोमधील घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली. जेव्हा एक नग्न व्यक्ती पुरस्कार सादरीकरणादरम्यान अवॉर्ड शोच्या स्टेजवर पोहोचला होता. यानंतर जिमी म्हणाला की, या मंचावर असे घडले असते तर कसे वाटले असते. यानंतर जॉन सीना स्टेजवर कपडे न घालता पोहचतो.

जॉन सीना हळू-हळू स्टेजवर येत असतो. त्यावेळी तो खूपच लाजत हळू-हळू चालतो. त्यानंतर तो स्टेजच्या मध्यभागी ठेवलेल्या माइकजवळ जाऊन उभा राहतो. यावेळी जॉन सीना किमेलला म्हणतो की, 'पुरूषांचे शरीर काही जोक नाही.' यावर होस्ट म्हणतो की, 'माझं आहे.' त्यानंतर जॉन सीना म्हणतो की, पोशाख आवश्यक आहे आणि त्याने जिमीसह सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा विजेता घोषित केला. जॉन सीनाची ही कृती पाहून सगळेच हसायला लागले.

दरम्यान, 96 व्या ऑस्कर अवॉर्ड 2024 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजता हा सोहळा पार पडला. ज्यामध्ये 'ओपेनहाइमर' चित्रपटाने विविध कॅटेगरीमध्ये 7 पुरस्कार जिंकले. या चित्रपटाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन याने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर अवॉर्ड जिंकला आणि मुख्य अभिनेता किलियन मर्फीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड जिंकला. याशिवाय लुडविग गोरानसनने 'ओपेनहाइमर'साठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकला. दरम्यान, यावर्षी भारताचे ऑस्कर अवॉर्ड जिंकण्याचे स्वप्न भंगले. 'टू किल अ टायगर' या ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या एकमेव डॉक्युमेंटरीला 'द लास्ट रिपेअर शॉप'कडून पराभवाला सामोरे जावे लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT