जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर अवॉर्ड 2024 शोची (Oscar Award 2024) प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज 96 व्या ऑस्कर अवॉर्डची घोषण्यात आली. मोठ्या थाटामाटामध्ये हा अवॉर्ड शो पार पडला. या अवॉर्ड शोमध्ये 'ओपनहायमर' या चित्रपटाचा डंका पाहायला मिळला. 'ओपनहायमर' या चित्रपटाने 7 ऑस्कर अवॉर्ड आपल्या नावावर केले. 'पुअर थिंग्स' या चित्रपटाला 4 ऑस्कर अवॉर्ड मिळाले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठमोळे दिवंगत आर्ट डायरेक्टर नितिन देसाई (Nitin Desai) यांना ट्रिब्यूट करण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्कर अवॉर्ड शोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये मराठमोळे दिवंगत ऑर्ट डायरेक्टर नितीन देसाई आणि कोरियन अभिनेता ली सन क्युनला ट्रिब्यूट करण्यात आले. या अवॉर्ड शोमध्ये एक व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. या व्हिडीओ क्लिपमध्ये नितिन देसाई यांचा एक फोटो दाखवण्यात आला. चित्रपटसृष्टीत नितिन देसाई यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये ट्रिब्यूट करण्यात आले. यासोबतच पॅरासाइट फेम अभिनेता ली सन-क्युनला देखील ट्रिब्यूट करण्यात आले. त्याचा देखील फोटो दाखवण्यात आला होता. फक्त या दोनच कलाकारांना नाही तर जगभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या इतरही कलाकारांना ट्रिब्यूट करण्यात आले.
प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2 ऑगस्ट 2023 रोजी आत्महत्या केली. त्यांनी एनडी स्टूडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितिन दसाई हे लोकप्रिय भारतीय आर्ट डायरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माते होते. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांसाठी आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले होते.
नितिन देसाई यांनी 20 वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये 'हम दिल दे चुके सनम' आणि 'बाजीराव मस्तानी' या सारख्या चित्रपटांचे जबरदस्त सेट तयार केले होते. त्यांनी राजकुमार हिरनी, विधु विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारिकर यासारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते. अशामध्ये नितिन देसाई हे जरी आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये ट्रिब्यूट करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.