ORMAX MEDIA JUNE 2026 MOST POPULAR ACTRESSES LIST: SAMANTHA RUTH PRABHU RETAINS NO.1, ALIA BHATT SECOND  saam tv
मनोरंजन बातम्या

Top 10 Actresses : टॉप १० लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर; रश्मिका-आलिया नाही तर 'ही' अभिनेत्री अव्वल, दीपिकाचा नंबर कितवा?

India Top 10 Actresses 2026 Update News : ऑरमॅक्स मीडियाने जून २०२६ मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची टॉप १० यादी जाहीर केली आहे. सामंथा रुथ प्रभूने पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी.

Alisha Khedekar

  • सामंथा रुथ प्रभूने ऑरमॅक्स मीडियाच्या जून २०२६ लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत पुन्हा पहिले स्थान मिळवले

  • आलिया भट्ट दुसऱ्या, तर दीपिका पदुकोण तिसऱ्या क्रमांकावर

  • रश्मिका मंदानाने चौथ्या स्थानावर झेप घेत साई पल्लवी आणि नयनतारा यांना मागे टाकले

  • दक्षिण भारतीय अभिनेत्रींचे टॉप १० यादीत पुन्हा एकदा वर्चस्व

भारतातील मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या ऑरमॅक्स मीडियाने जून २०२६ ची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची टॉप १० यादी जाहीर केली आहे. या यादीत यावेळीही साऊथ अभिनेत्रींचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मागील महिन्यात अव्वल स्थानी असलेली बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यंदा दुसऱ्या क्रमांकावर असून, सामंथा रुथ प्रभूने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले.

सामंथा रुथ प्रभूने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या लोकप्रियतेचा ग्राफ कायम वाढता ठेवला आहे. एप्रिल महिन्यातही ती अव्वल स्थानावर होती आणि जूनमध्येही तिने हे अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आहे. तर तिसऱ्या स्थानावर दीपिका पदुकोणने झेप घेतली आहे.

चौथ्या क्रमांकावर रश्मिका मंदाना असून तिने साई पल्लवी आणि नयनताराला मागे टाकत मोठी प्रगती केली आहे. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या स्थानावर साई पल्लवी असून ती लवकरच रणबीर कपूरसोबत बहुचर्चित 'रामायण' चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिच्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

सातव्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने स्थान मिळवले आहे. आठव्या क्रमांकावर नयनतारा, तर नवव्या क्रमांकावर तृषा कृष्णन आहे. दहाव्या स्थानावर यावेळी श्रीलीलाने पुनरागमन करत टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीवरून स्पष्ट होते की, भारतीय चित्रपटसृष्टीत दक्षिणेतील अभिनेत्रींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

SCROLL FOR NEXT