Smita Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Smita Patil: मॉर्डन विचारांची 'ही' अभिनेत्री जीन्सवर नेसायची साडी; स्मिता पाटीलचे निर्णयही असायचे हटके !

70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी आहे.

Pooja Dange

Smita Patil Career: स्मिता पाटील यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं. त्यांनी चित्रपटामध्ये केलेल्या कामांमुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आज स्मिता पाटील यांची पुण्यतिथी आहे. १३ डिसेंबर, १९८६ झाली त्यांचे निधन झाले होते. अवघ्या वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता यांनी या जगाच्या निरोप घेतला.

70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात जन्मलेल्या स्मिता पाटील यांचे वडील शिवाजी राय पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची आई विद्या ताई पाटील या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. तीन बहिणींमधली स्मिता बॉलीवूडमध्ये त्यांचा सावल्या रंगामुळे आणि बोलक्या डोळ्यांमुळे प्रसिद्ध होत्या.

स्मिता पाटील यांनी पुण्यात शिक्षण घेतले होते. स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकाची आवड होती. हिंदीसोबतच त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. अवघ्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता यांनी बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले.

अभिनेत्री होण्यापूर्वी स्मिता न्यूज रीडर होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी न्यूज रीडर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या मुंबईत दूरदर्शनवर मराठीत बातम्या वाचायच्या. त्याकाळी त्या जीन्स घालायच्या, तेव्हा समाजाला ते डिवचण्यासारखे होते. पण आधुनिक विचारांच्या स्मिता जीन्स-टॉप घालून न्यूजरूममध्ये जायच्या आणि जीन्सवर साडी नेसून कॅमेऱ्यासमोर बातम्या वाचायच्या.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांना भेटल्यावर स्मिता पाटील यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. बेनेगल चित्रपट निर्माण करण्याच्या तयारीत होते आणि स्मिता यांची प्रतिभा ओळखून त्यांनी त्यांना त्यांच्या 'चरणदास चोर' चित्रपटात भूमिका ऑफर केली.

'चरणदास चोर' नंतर स्मिता यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला. 70 आणि 80 च्या दशकात स्मिताने एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट दिले. 1981 मध्ये 'चक्र'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1985 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

स्मिता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप उत्साही असायच्या. त्यांचा जीवन राज बब्बरसोबतच्या असलेल्या त्यांच्या प्रेमकथेमुळेही चर्चेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT