Humane Sagar Death: अनेक दिवसांपासून जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असलेले ओडिया गायक ह्युमन सागर यांचे निधन झाले आहे. सोमवारी संध्याकाळी वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामुळे ओडिया चित्रपट आणि संगीत विश्वाला धक्का बसला.
वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप
डॉक्टरांच्या मते, ह्युमन सागर यांचे मल्टी-ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोममुळे निधन झाले. त्यांची तब्येत बिघडत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर एम्स भुवनेश्वर येथे उपचार सुरू होते. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १:१० वाजताच्या सुमारास ह्युमन सागर यांना गंभीर अवस्थेत एम्स भुवनेश्वर येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवले आणि अनेक टेस्ट केल्या. रिपोर्टमध्ये असे दिसून आले की त्यांच्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे थांबवले होते. डॉक्टरांनी त्यांचे लिव्हर फेल होणे, न्यूमोनिया आणि डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचा त्रास असल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती वेगाने बिघडली आणि सोमवारी संध्याकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या दुःखद बातमीने राज्यभरात शोककळा पसरली आहे.
दोन दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल
दोन दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर त्यांना लवकर बरे व्हावे अशी अशा व्यक्त केली. त्यांनी लिहिले की संपूर्ण राज्य त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि त्यांच्या कुटुंबात आणि संगीताच्या जगात परत येतील.
गायकाच्या आईने मॅनेजरवर आरोप केले
गायकाच्या मृत्यूनंतर, त्यांची आई शेफाली यांनी ह्युमनच्या मॅनेजरवर आणि कार्यक्रम आयोजकांवर गंभीर आरोप केले, त्यांनी असा आरोप केला की गायकाला त्यांची तब्येत खराब असतानाही कॉन्सर्ट करण्यास भाग पाडले गेले.
ह्युमन सागरची लोकप्रियता केवळ त्यांच्या गाण्यांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी इश्क तू ही तू या चित्रपटाच्या शीर्षकगीताने संगीत विश्वात पदार्पण केले, जो प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर, त्यांनी ओडिया चित्रपट उद्योगात शेकडो गाणी गायली. तसेच मेरा ये जहाँ सारख्या अल्बमद्वारे हिंदीमध्येही आपली छाप पाडली. त्यांचा आवाज ओडिशातील प्रत्येक घरात घुमत होता आणि आज त्यांच्या जाण्याने कायमी पोकळी निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.