Nushrratt Bharuccha Gratitude Towards Indian Government Instagram
मनोरंजन बातम्या

Nushrratt Bharuccha Post: ‘खरंच भारतीय खूप नशीबवान...’; युद्धातून सुखरूप परतलेल्या नुसरत भरुचाने पहिल्यांदाच शेअर केला चाहत्यांसोबत अनुभव

Nushrratt Bharuccha News: भारतात परतल्यानंतर नुसरत भरुचाने सोशल मीडियावर आपल्यासोबत इस्राइलमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून सर्व भयावह घटनेचे वर्णन केले आहे.

Chetan Bodke

Nushrratt Bharuccha Gratitude Towards Indian Government

इस्रायल आणि हमासमधील तणाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. (Israel- Hamas War) या युद्धामध्ये दोन्ही राष्ट्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवीतहानी होत असून या संघर्षाने आता गंभीर रुप धारण केलं आहे. या युद्धामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) सुद्धा अडकली होती.

दरम्यान अभिनेत्री रविवारी दुपारी भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशियल स्टेटमेंट केलं असून त्यात तिनं सर्व भयावह घटनेचे वर्णन केले आहे.

शनिवारी (७ ऑक्टोबर) दुपारी अभिनेत्रीच्या टीमने तिच्यासोबत अखेरचा संवाद साधला होता. त्यानंतर तिचा संपर्क झाला नाही. रविवारी (८ ऑक्टोबर) सकाळी अभिनेत्री नुसरत भरुचा इस्राइलमध्ये अडकल्याची बातमी समोर आली होती. अवघ्या काही तासानंतर अभिनेत्री भारतात परत येणार असल्याचे वृत्त आले.

अभिनेत्री मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी तिच्याभोवती गराडा घातला होता. यावेळी तिचा अस्वस्थ वाटणारा चेहरा, त्या युद्धाची चेहऱ्यावरील असलेली भिती स्पष्टपणे आपल्याला दिसून येत होती. तिने त्यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला नव्हता. त्यानंतर आता अभिनेत्रीने पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, “सर्वात आधी मला ज्यांनी मेसेज करुन धीर दिला, ज्यांनी मी सुखरुप राहावी यासाठी प्रार्थना केली, त्यांचे मी आभार मानते. मी पुन्हा रविवारी घरी परतली असून मी सुखरूप आहे. आम्ही इस्राइलमधील टेलव्हिव हॉटेलमध्ये असताना बॉम्बस्फोटामुळे आणि बॉम्बब्लास्टिंगच्या आवाजामुळे आम्ही खूपच घाबरलो होतो. त्यावेळी आम्ही हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असल्यामुळे नक्की काय घडतंय?, याची काहीच कल्पना नव्हती..”

आपल्या व्हिडीओमध्ये नुसरत पुढे म्हणते, पुढे नुसरत म्हणाली, “मी आजपर्यंत अशा वातावरणात कधीच राहिलेले नाही, ज्यावेळी मी माझ्या घरामध्ये सकाळी झोपेतून उठले, तेव्हा खरंच आपण भारतामध्ये किती सुरक्षित राहतो, याची मला जाणीव झाली. आपण खरंच भारतीय खूप नशीबवान आहोत. याचसाठी मी आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे, भारतीय व इस्रायल दूतावासाचे आभार मानते. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली मी आज सुखरूप माझ्या देशात परतले. अनेक लोकं आजही त्या युद्धात अडकले आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते व लवकरच शांतता प्रस्थापित होईल अशी आशा करते.”

सोबतच यावेळी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करताना, पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासह काही महत्वाच्या खात्यांनाही तिने टॅग केलं होतं. यासोबतच नुसरतने इस्राइलमध्ये आलेल्या संपूर्ण अनुभवाबद्दल आणखी एक वेगळी पोस्ट करत तिच्या भावना लेखी स्वरूपात मांडल्या आहेत. त्या पोस्टवर सुद्धा तिने संबंधित व्यक्तिंना टॅग केलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची आणि व्हिडीओची प्रचंड चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT