Nora Fatehi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: मानलेल्या भावाच्या लग्नासाठी नोराचा 'दादर ते कोकण' रेल्वेप्रवास; हळदीचा डान्स व्हिडीओ पाहिलात का?

Nora Fatehi Video: नोरा मानलेल्या भावाच्या हळदीनिमित्त कोकणात पोहचली आहे. पहिल्यांदाच दादर स्टेशन ते रत्नागिरी असा प्रवास नोराने केला आहे. तिने सोशल मीडियावर तिचा अनुभव शेअर केला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री नोरा फतेही कधी डान्समुळे तर कधी फॅशन स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. नुकतंच नोराने पुन्हा एकदा नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर नोरा सक्रिय असलेली पाहायला मिळते. सध्या नोराने लग्नानिमित्त कोकण रेल्वे प्रवास केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

नोराने कोकणात खास रेल्वेने प्रवास केला आहे. दादर स्टेशन ते रत्नागिरी असा प्रवास तिने केला आहे. मानलेल्या भावाच्या हळदीनिमित्त ती कोकणात पोहचली आहे. याच दरम्यानतला व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नोराने प्रवास करतानाचा अनुभव शेअर केला आहे, नोराने म्हणतेय मी पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करत आहे. मला कुणी ओळखू नये. म्हणून मी चेहरा झाकला आहे. मी दादर स्टेशनवरून ट्रेन पकडली. सकाळी ६ वाजले आहेत आणि आम्ही रत्नागिरीला पोहचलो आहे. अनुप त्याच्या परिवारासोबत मला घ्यायला स्टेशनला आला आहे. मी देखील अनुपच्या कुटुंबियांना पहिल्यादाच भेटतेय अनुप आणि मी ८ वर्षापासून एकत्र आहे. तो माझा भाऊ आहे. मी इथे सर्वांना भेटले आम्ही हळदीत छान डान्स केला मी स्वताला खूप भाग्यवान समजते. माझी प्रमाणिक टीम माझ्यासोबत आहे.

नोराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नोरा तिच्या मानलेल्या भावाच्या हळदीनिमित्त रत्नागिरीला गेली आहे. तिने कोकण रेल्वेने प्रवास केलेला सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत नोराने कॅप्शनमध्ये,"माझा मानलेला भाऊ अनुपच्या हळदी समारंभाचा रत्नागिरीतला हा छोटा ब्लॉग मी केला आहे.

लग्नानिमित्त आम्ही ट्रेन पकडून रत्नागिरीला आलो आहे. मस्त सुंदर अनुभव, अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये ८ वर्षापासून आहे. तो २०१७ पासून तो माझा प्रवास कॅमेऱ्याच्या मागून कॅप्चर करत आहे. आता तो कॅमेरासमोर आहे. प्रत्येकवेळी तो माझ्यासाठी उभा राहिला आहे. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ. अनुप आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा." सोशल मीडियावर नोराच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT