nora fatehi Song Social Media
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Song Controversy: नोरा फतेहीला मोठा झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, यूट्यूबवरूनही गाणं हटवलं

Nora Fatehi Song Controversy: नोरा फतेहीचं सरके चुनर हे गाणं आता युट्यूबवरून हटवलं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी टीका केली. या गाण्यातील शब्द अश्लील असल्यानं नेटकरी संतापले.

Manasvi Choudhary

Nora Fatehi Sarke Chunar Song: 'केडी:द डेव्हिल' या आगामी चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या गाण्याचं नाव सरके चुनर... असं आहे. या गाण्याचं नाव साधं असलं तरी गाण्यातील अश्लील ओळींमुळं ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अभिनेता संजय दत्ता आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्यावर हे गाणं चित्रित झालं असून या गाण्याने चांगलीच खळबळ उडवली आहे. गाण्याच्या अश्लील लिरिक्सवरून हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाची ठिणगी उडाली.

या गाण्यातील अश्लील ओळींमुळे सोशल मीडियावर नोरा फतेहीसह सर्वच टीम ट्रोल होत आहे. सोशल मीडियाच्या तीव्र विरोधानंतर निर्मात्यांनी नोरा फतेहीचं 'सरके चुनर' हे गाणं युट्यूबवरून हटवलं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याच्या अश्लील लिरिक्सवरून जोरदार टीका केली होती.

'केडी द डेव्हिल' चित्रपटातील 'सरके चुनर' हे गाणं रविवारी रिलीज झालं. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. नोरा फतेहीचा डान्स पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं . तसेच गाण्याचे लिरिक्स अत्यंत अश्लील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंडस्ट्रीतील अनेक स्टार्संनी देखील या गाण्याला विरोध केला आहे. अशातच, वाढता गदारोळ पाहता, नोरा फतेहीचे हे गाणं युट्यूबवरून काढून टाकण्यात आलं आहे. Entertainment News In Marathi

'सरके चुनर' या गाण्यामध्ये नोरा फतेही घागरा- चोली घालून डान्स करते आहे. नोरा फतेहीसोबत या गाण्यांमध्ये संजय दत्तदेखील आहे. तिच्या डान्सने सर्वांनाच वेडे केलं आहे. गाण्याचे बोल आणि या गाण्यातील नोरा फतेहीच्या अदाकारीने सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं. नेटकऱ्यांनी या गाण्याच्या लिरिक्सवर टीका केली.

'KVN प्रॉडक्शन्स' च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अर्जुन जन्य यांनी केलं आहे. याचे गाण्याचे लिरिक्स रकीब आलम यांचे आहेत. गायिका मंगली हिने हे गाणे गायले आहे. मात्र, गाणे प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्याची नामुष्की ओढवली.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT