Nora Fatehi  saam tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या 'सरके चुनर..' गाण्यावर बंदी? तक्रार दाखल, युट्यूबवरूनही हटवलं, नेमका वाद कशावरून?

Complaint Seeks Ban On Nora Fatehi, Sanjay Dutt New Song : डान्सर नोरा फतेहीच्या अडचणी वाढल्या आहेत. नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या नवीन गाण्यावर बंदी घालण्याची तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नोरा फतेही आणि संजद दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर नेटकरी संतापले.

'केडी-द डेविल' चित्रपटात नोरा फतेही आणि संजद दत्त एकत्र दिसणार आहे.

नोराच्या 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोरा फतेही आणि संजय दत्त 'केडी - द डेव्हिल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी सरके' गाणे पाहून नेटकरी संतापले आहेत. 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यात अश्लील शब्द तसेच अश्लील डान्स स्टेप्स पाहायला मिळत आहेत. यामुळे आता एका वकिलाने 'केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे' (CBFC) धाव घेत, 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. या गाण्याचे बोल आणि दृश्ये अश्लील असून, विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी ते हानिकारक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी माहिती TOI ने 'एएनआय'च्या (ANI) वृत्तावरून दिली आहे. वकील विनीत जिंदाल यांनी या संदर्भात एक तक्रार दाखल केली असून, या गाण्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच हे गाणे आता युट्यूबवरूनही हटवण्यात आले आहे.

'एएनआय'च्या माहितीनुसार, या तक्रारीची प्रत 'माहिती आणि प्रसारण मंत्रालया'लाही पाठवण्यात आली आहे. तक्रारदाराचा असा आरोप आहे की, "हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या गाण्यामध्ये अत्यंत अश्लील, घाणेरडी, बीभत्स अभिव्यक्तींचा समावेश आहे. या गाण्याचे चित्रीकरण आणि नृत्याचे प्रसंग अश्लीलतेला खतपाणी घालते ज्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होतो."

तक्रारीनुसार, या गाण्यातील काही ओळी (lyrics) स्पष्टपणे आक्षेपार्ह असून सार्वजनिक प्रदर्शनासाठी अयोग्य आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी त्या सहज उपलब्ध होत असल्याने ही बाब अधिकच गंभीर ठरते. जेव्हा अशा प्रकारचे कंटेंट ऑनलाइन उपलब्ध असतात, तेव्हा मुलं लहान वयात अयोग्य माहितीच्या संपर्कात येतात. तक्रारीत गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम, संगीतकार अर्जुन जान्या आणि गायिका मंगळी यांचा समावेश आहे.

तक्रारदाराने कायदेशीर दृष्टिकोनातून असे सांगितले की, या गाण्याचे प्रकाशन आणि प्रसारण केल्यामुळे 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम 294 अंतर्गत दंडात्मक तरतुदी, तसेच POCSO आणि 'माहिती तंत्रज्ञान कायदा' (IT Act) यांच्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या गाण्याच्या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या 'सायबर सेल'कडे यापूर्वीच एक स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT