Nora Fatehi saam tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi : नोरा फतेहीने 'सरके चुनर' या अश्लील गाण्यावर सोडलं मौन, सर्वकाही स्पष्टच सांगितले | VIDEO

Nora Fatehi First Reaction On Sarke Chunar Song : नोरा फतेहीने 'सरके चुनर' गाण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नोरा फतेही 'सरके चुनर तेरी सरके' या अश्लील गाण्यामुळे चांगलीच ट्रोल होत आहे.

नोराने 'सरके चुनर ' या गाण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नोराने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे.

नोरा फतेही 'सरके चुनर तेरी सरके' (sarke Chunri Teri Sarke) गाण्यामुळे प्रचंड ट्रोल होत आहे. हे गाणे 'केडी - द डेव्हिल' (KD: The Devil) चित्रपटातील आहे. या गाण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या गाण्यात अश्लील शब्द तसेच अश्लील डान्स स्टेप्समुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'सरके चुनर तेरी सरके' गाण्याचे संगीत दिग्दर्शक अर्जुन जान्या आहेत. गीत रकीब आलम यांनी लिहिले आहे आणि हे गाणे गायक मंगली यांनी गायले आहे. आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे.

व्हिडीओमध्ये नोरा फतेहीने म्हटल्यानुसार, नोराने 'सरके चुनर' हे गाणे तीन वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केले आहे. अभिनेते संजय दत्त झळकणार असल्यामुळे तिने या गाण्याला होकार दिला. तिला मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. गाण्याच्या भाषांतराबद्दल सर्व निर्मात्यांवर अवलंबून असते. नोराला कन्नड समजत नसल्याने तिने निर्माते जे सांगत आहे, त्यावर विश्वास ठेवला. या गाण्याने हिंदी बोल खूप वाईट असल्याचे नोराने स्वतःने सांगितले आहे. तसेच या सर्वाची नोराला काहीच कल्पना नव्हती. नोराला हिंदी डबिंग विषयी काही माहिती नव्हते. तिला थेट लाँच इव्हेंटमध्ये समजले.

नोरा फतेही व्हिडीओत म्हणाली की, "निर्मात्यांनी माझ्या परवानगीशिवाय हिंदीत व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्यांनी माझा आणि संजय दत्त यांचा AI जनरेटेड फोटो तयार केला. " नोराला हिंदी समजत असल्यामुळे तिला गाण्याच्या लाँच दरम्यान हे सर्व चुकीचे असल्याचे वाटले. त्यानंतर नोरा दिग्दर्शकाला बोलायला गेली. त्याला सांगितले की, "हे चुकीचे आहे. यावर प्रचंड टीका होणार...माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे..."

शेवटी नोरा म्हणाली की, "मी काय नेपो किड नाही. मला पाठिंबा देणारे, माझ्यावर प्रेम करणारे फक्त माझे प्रेक्षक आणि माझे चाहते आहेत. मी तुम्हाला विनंती करते की हे गाणे कुठेही शेअर करू नका...माझ्या चारित्र्यावर वाईट बोलणे थांबवा. मी भविष्यात कोणताही प्रोजक्ट निवडताना अधिक काळजी घेईन. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT