Nitin Manmohan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nitin Manmohan: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा! प्रसिद्ध निर्मात्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

बोल राधा बोल, लाडला यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते नितीन मनमोहन यांचे आज, गुरुवारी निधन झाले.

Chetan Bodke

Nitin Manmohan: बॉलिवूडवर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बोल राधा बोल, लाडला यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते नितीन मनमोहन यांचे आज, गुरुवारी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Bollywood)

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबरला संध्याकाळी नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, लगेचच त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नितीन मनमोहन यांना रुग्णालय प्रशासनाने उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते.

नितीन मनमोहन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली होती. 'बोल राधा बोल', 'लाडला', 'दस' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती मनमोहन यांनी केली होती, सोबतच सलमान खानच्या 'रेडी' चित्रपटाचीही निर्मिती नितीन मनमोहन यांनीच केली होती. विशेष म्हणजे नितीन (Nithiin) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनमोहन यांचे सुपुत्र होते. मनमोहन हे 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' यांसारख्या चित्रपटांमुळे आजही ओळखले जातात. (Bollywood Films)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT